सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवर चौक -कर्जंत फाट्यावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून प्रत्येक गाडीची पहाणी करण्यात आली.
नागपुरात होणारे विधी मंडळाचे अधिवेशन कोरोना आणि अन्य आपत्कालीन बाबींमुळे मुंबईत येथे सोमवारी १४ तारखेला सुरू होत आहे.या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला द्यावयाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा व अन्य मराठा समाज मुंबईत आझाद मैदानावर एकत्र येऊन पुढील काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी एकत्र येत आहे.हे कार्यकर्ते मुंबईत एकत्र येऊ नये यासाठी हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती मिळाली आहे.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने मराठा समाजाच्या नेत्यांच्या गाडीचे क्रमांक घेऊन त्या गाड्या अडविण्यात आल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला.तर काही कार्यकर्ते गनिमी कावा करून आझाद मैदानात पोहचले असल्याचे विनोद साबळे यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले.
मराठा समाजाला द्यावयाच्या आरक्षणाचा चेंडू कोणाच्या कोर्टात आहे,याबद्दल सर्वसामान्य मराठा समाजाला अवगत नाही.पण मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वच ठाम आहेत.








Be First to Comment