Press "Enter" to skip to content

संस्कार भारतीचा दिवाळी परिवार मेळावा ऑनलाईन

अन्न is पूर्णब्रह्म हे प्रहसन सादर

डॉ. विद्याधर ओक यांचे विवाहशास्त्रावर मार्गदर्शन

पनवेल दि. १३ः श्रीनिवास काजरेकर

संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने प्रतिवार्षिक दिवाळी परिवार मेळावा यंदा ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाला. “अन्न is पूर्णब्रह्म” हे पारंपारिक अन्नसंस्कृतीचे महत्व सांगणारी नाटिका व औषधशास्त्रतज्ञ डॉ. विद्याधर ओक यांच्या विवाहशास्त्र या विषयावर आधारित “शुभमंगल (बे)सावधान” हा मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.
कृष्णाली जोशी हिच्या अन्नपूर्णास्तोत्रावर आधारित भरतनाट्यम् नृत्याने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रसिद्ध लेखिका डॉ. समिधा गांधी लिखित व केदार जोशी दिग्दर्शित “अन्न is पूरणब्रह्म” या नाटिकेचे सादरीकरण झाले. सुनिता खरे यांच्या संकल्पनेतून सादर झालेल्या या नाटिकेमधे
वैजयंती बुवा, सखी बुवा, श्रीपाद वैशंपायन, श्रीनिवास काजरेकर, आनंद भोईर, सायली गोखले, स्वानंद गोखले, शार्दुल बुवा, अनुश्री जोशी, प्रज्ञा पेंडसे आदी कलाकारानी सहभाग घेतला. याचे तंत्रसहाय्य नेहा खरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात “शुभमंगल (बे)सावधान” हा कार्यक्रम संपन्न झाला. यामधे डॉ. विद्याधर ओक यानी ‘विवाहशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. दिपक पळसुले, देसाई यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुलक्षणा टिळक यांनी आभारप्रदर्शन केले. वंदेमातम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमप्रमुख मिलिन्द गांगल, अॅड्. अमित चव्हाण, सिद्धेश झारे, अक्षय गायकर यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. हा कार्यक्रम ‘कलाभारतियम्’ च्या फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
https://www.facebook.com/kalabharatiyam/videos/210921190575545/

विवाह ही जबाबदारी



विवाह हे सुखाचे साधन नसून ती एक जबाबदारी आहे याची जाणीव नसल्याने घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. संसार टिकून राहण्यासाठी स्त्री व पुरुषांनी स्वतःचे गुण ओळखले पाहिजेत तसेच निसर्गाने दिलेल्या जबाबदारीची जाणीवही ठेवली पाहिजे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा चुकलेला मार्ग आहे कारण त्यामधे परस्परांशी एकनिष्ठता असण्याची पूर्णपणे खात्री नाही. तसेच यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत यासाठी महाविद्यालयामधे विवाहशास्त्र हा विषय शिकविला जाणे आवश्यक आहे.
डॉ. विद्याधर ओक
प्रमुख वक्ता

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.