पनवेल, दि.12 (वार्ताहर)
पनवेल तालुक्यातील मौजे काळुद्रें गाव व रायगडचे सुपुत्र, सेवानिवृत्त निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी नथुराम गोपाळ गायकवाड यांचे पनवेल येथील राहते घरी वयाच्या 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
नथुराम गोपाळ गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्य शासन, महसूल खात्यात एकूण 38 वर्षे नोकरी करून 31 जानेवारी 2005 रोजी मुंबई उपनगर उप जिल्हाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांना त्यांचे शासकीय सेवेत , महाराष्ट्र शासनाकडून सन्मानपत्र ,राज्यपालांचे गौरव चिन्ह ,केंद्र शासनाकडून उत्कृष्ट कामगिरी बद्दल ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आले आहे. तसेच सेवानिवृती नंतर मुंबई ,ठाणे येथील वेगवेगळ्या संघटना , मंडळांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात ,त्यांची पत्नी सुलोचना नथुराम गायकवाड, दोन मुलगे सुनील गायकवाड ,अनिल गायकवाड .दोन मुली शैलजा सरवदे, रेखा कांबळे. जावई गुणशील सरवदे ,रत्नदीप कांबळे ,सुना सुजाता गायकवाड, शितल गायकवाड आणि नातवंडे असा परिवार आहे.











Be First to Comment