कर्जत- दि.12 (संजय गायकवाड)
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले बाणकोट आणि मंडणगडावरील तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे सागवानी तोफगाडयांवर विराजमान करून पूजन करण्यात आले.
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर संवर्धनाचे कार्य गेल्या 12 वर्षापासून करत आहे. राज्य पुरातत्व विभाग केंद्र पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्या मार्गदर्शनाने हे काम होत आहे. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी हि चळवळ महाराष्ट्रात उभी केली असून आज हजारो दुर्गसेवक हे संस्थेला जोडले गेले आहेत. कार्याध्यक्ष माजी आमदार संजय केळकर यांचे मार्गदर्शन दुर्गसेवकांना लाभत असून आता हि चळवळ मोठ्या प्रमाण होत असून ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांना चांगले दिवस येतील आणि संवर्धन होईल अशी आशा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गडकिल्ले यांचे संवर्धन होणे हि काळाची गरज आहे. मंडणगड येतील किल्ले मंडणगड आणि किल्ले हिम्मतगड उर्फ बाणकोट किल्ला यावर सह्याद्री प्रतिष्ठान संवर्धनाचे कार्य स्थानिक ग्रामस्थ यांच्या सोबत करत आहे. या दोन्ही किल्ल्यावर एक- एक तोफ असून या तोफांना पुर्नवैभव प्राप्त व्हावे त्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन विभाग, दापोली विभाग आणि मंडणगड विभाग यांनी या तोफांना सागवानी तोफगाडे बनविण्याचा निर्णय घेऊन. शासना अंतर्गत असलेल्या राज्य पुरातत्व विभागाकडे या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने व परवानगीने बाणकोट किल्लाच्या तोफगाड्याची पुरातत्व निकषाने आराखडा तयार करून तोफगाडा तोफगाडा बसविण्यात आला. राज्य पुरातत्व विभागाचे किल्याच्या डागडुजीचे अतिशय सुंदर असे काम किल्ल्यावर सुरु आहे. राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे आणि रत्नागिरी विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे लोकवर्गणीतून आजवर महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर असे 30 तोफांना तोफगाडे बसविण्यात आले आहेत. किल्ल्याच्या दुर्ग अवशेषांचे आणि वास्तूंचे जतन व्हावे आणि त्यांना पुर्न्वैभव प्राप्त व्हावे असा उद्देश संस्थेचा आहे. मंडणगड किल्ल्यावर बसविण्यात आलेल्या तोफगाड्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी हायकोर्ट सरकारी वकील ॲड.श्रीकांत गावंड, हेमंत शाह, अनिल शिंदे, कु.शर्विका म्हात्रे,दिलीप होळकर, नरेश पाबरकर, सुनिल खाडे, विजय घाटवळ, गजानन पाटिल, भास्कर पाटिल, मनोज भाटकर, रामचंद्र कदम, उमाजी रेवाले, सुनिल जाधव, नारायण शिंदे, मीना तबिब आदी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग,अलिबाग पुणे आणि मुंबई दुर्गसेवक उपस्थित होते.







Be First to Comment