सेंट्रल पार्क तसेच इतर प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांंच्या रोजंदारी प्रश्नाबाबत शिवसेना पाठपुरावा करणार
पनवेल, दि.11 (संजय कदम)
सेंट्रल पार्क तसेच इतर प्रकल्पग्रस्त कर्मचार्यांना रोजंदारी अथवा रायगड सुरक्षा मंडळात सामाविष्ट करण्याबाबत शासनाकडे शिवसेना माध्यमातून आपण पाठपुरावा करू असे आश्वासन शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी कर्मचार्यांना दिले आहे.या कर्मचाऱ्यांनी बबन दादा यांची आज कमलगौरी हिरू पाटील शैक्षणिक संकुलात भेट घेतली.
शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील ह्यांची खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, नगरसेवक विश्वास चौधरी ह्यांच्यासह इतर अनेक कर्मचार्यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात माहिती दिली. तसेच या सर्व कर्मचार्यांना रोजंगारी आणि रायगड सुरक्षा मंडळात समाविष्ट करण्यााबाबत मागणी करून त्यास्वरूपाचे निवेदन दिले. या मागणीची दखल घेत या संदर्भात संबंधित खात्याकडे पाठपुरावा करून कामगार बांधवांना न्याय मिळवून देवू असे आश्वासन जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी दिले आहे.
Be First to Comment