सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
कोरोनाच्या महामारीमध्ये शाळा विद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील साने गुरुजी विद्यालयाने शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे.
कोरोनाच्या महामारीमध्ये शाळा विद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाऊ नये हा उद्देश विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान अडसरे आणि शिक्षक यांनी चर्चा करून निर्णय घेतला की,आपल्या विद्यालयात येणारे विद्यार्थी यांच्या कुटुंबाची परिस्थिती ही बेताची आहे.त्यामुळे त्यांच्या पालकांना आपल्या पाल्यानां भ्रमणध्वनी, टॅब घेऊन शक्य नाही. तसेच काही ठिकाणी इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे सर्वांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही.शिक्षण न मिळाल्यामुळे विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याचीही भीती होती.
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संपर्क करणे कठीण झाले आहे.म्हणून सर्व शिक्षकांनी ठरविले की विद्यालयातील विद्यार्थी हे ज्या ज्या गावातील आहेत त्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना एका ठिकाणी एकत्र करीत त्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात सुरू करण्यात आली आहे.
साने गुरुजी विद्यालयातील शिक्षकांचे मुख्याध्यापक सोपान अडसरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र पाटील, प्रवीण चोगले,प्रकाश चव्हाण,नीलम अंबाजी,मनिषा सुर्वे-पवार,कविता भगत,पुगावकर आदी शिक्षकांचे वेगवेगळे गट तयार करून वेगवेगळ्या गावात जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम सुरू केले आहे.
त्यांच्या या उपक्रमाबाबत विद्यार्थी आणि पालक यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे कौतुक केले आहे.








Be First to Comment