सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र शासनाचे कृषीविषयक धोरणास विरोध करण्यासाठी रसायनीत १०० टक्के बंद ठेवण्यात आला. यावेळी रसायनी ते दांडफाटा परीसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या मनाने आपली दुकाने बंद ठेवली होती.

शेतकरी वाचला तर देश वाचेल अशी सद्या चर्चा ऐकावयास मिळत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न विचारताच कृषीविषयक कायदा मंजूर केला. मात्र यामध्ये भांडवालदारी लोकांचे फायदा आहे. शेतकऱ्याला आपली हक्काची जमीन वापरास बंदी राहील. अशी अनेक प्रकारची गुंतागुंत असलेला कायदा सरकारने पास केलाच कसा. शेतकरी थेट आपला माल विकु शकेल असे जरी केंद्र सरकार सांगत असले तरी भविष्यात आपली जमिनीचा ताबा ज्या कंपन्या भांडवल पुरवणार आहेत त्या घेतल्याशिवाय राहणार नाहीत याची भीती शेतकऱ्याला आहे. म्हणूनच संपूर्ण देशात आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला प्रचंड साथ देत रसायनीकरांनी आज “भारत बंद” “रसायनी बंद” यशस्वी करून दाखवले आहे.
रसायनीकर शेतकऱ्यांचा पाठीशी आहेत हे यातून स्पष्ट झाले आहे.रसायनीतील वावेघर,मोहोपाडा व रिस बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वघलता या बंदला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला.मंगलवारी भारत बंदला दुपारी चार वाजेपर्यंत सर्वांनी पाठिंबा दिल्याने बाजारपेठांत शुकशुकाट जाणवत होता.








Be First to Comment