Press "Enter" to skip to content

कोळी महासंघाकडून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाची पायमल्ली

जिल्हाधिकारी कारवाई करतील का ?

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील हरेश्वर मैदानात कोळी महासंघाच्या आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या जमावबंदी आदेशाची पायमल्ली झाली असून याबाबत जिल्हाधिकारी आयोजित कार्यक्रमाबाबत कारवाई करतील का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोना काळात आणि त्यांनतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळ मध्ये किनाऱ्यावर असणारे कोळी वाडे हे उध्वस्त झाले होते.त्यामुळे कोळीवाड्यातील मच्छिमार यांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले होते.असा कोळी बांधवाना फुल ना फुलाची पाकळी म्हणून कोळी महासंघाच्या वतीने साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कोळी महासंघानी जाळी (काचरा),शितपेटी, बॅटरी, टब,आणि धनादेश यांचे वाटप करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची हस्ते चार ते पाच जणांना साहित्य वाटप करण्यात आले,मात्र ते कार्यक्रमातुन निघून गेल्यानंतर मात्र साहित्य घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात जमाव झाला.त्या जमावाला आवरताना खासगी सुरक्षा रक्षक,(बाऊन्सर),सहीतपोलीस दलाची दमछाक झाली होती.

आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे कार्य असेल तर शंभर दीडशे पेक्षा अधिक जणांना एकत्रित येण्यास परवानगी दिली जात नाही मग या कार्यक्रमासाठी तीन ते चार हजार नागरिक एकत्र कसे काय आले.विशेष म्हणजे यावेळी पोलीस कर्मचारी सहित जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्ग ही उपस्थित असताना कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही हे विशेष आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि उच्चभ्रू नागरिकांना वेगळा न्याय.

या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार रविंद्र पाटील,माजी मंत्री गिरकर,आमदार निरंजन डावखरें, मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर, कोळी कोळी महासंघाचे नेते तथा आमदार रमेश पाटील, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष ऍड.महेश मोहिते, ऍड.चेतन पाटील सहित आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.