सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन रिस येथे भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांच्याहस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर रसायनी परिसरातील पदाधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहन कांबळे यांनी कविता वाचन करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.तर सम्यक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षंमय जीवन चरित्राची माहिती सांगितली.भारतीय संविधानाचे निर्मांते डॉ.बाबासाहेबांनी शिका संघटीत व्हा आणि संघर्षं करा हा मुलमंत्र आम्हा भारतीयांना दिला असे मनोगतात सांगितले.
यावेळी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी सांगितले की सर्वांनी एकत्र या,संघटीत व्हा, सर्वांनी एकत्र आल्यास कोणतेही काम करणे शक्य होते असे प्रकाशशेठ गायकवाड यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सम्यक सामाजिक संस्थेच्यावतीने महिला अध्यक्षा सौ.रेखा गायकवाड, वैशाली कांबळे, सोनाली दळवी,पुजा झा,दिपक इंगले, सुनील निकाडे,संदिप निकाडे, विठ्ठल पाचपिंडे,मोहन कांबळे, उदय जाधव, सुरेंद्र कसबे,दयानंद सरोदे, हेमंत वानखेडे,,जिवन तायडे, फुलचंद लोंढे,संपत पठारे,संतोष खिल्लारे, बाबासाहेब किर्दंकुडे, दत्ता कांबळे, गणेश जावले,राहूल रणखांबे,मलीभाउ कांबळे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल निकाडे यांनी पाहिले तर आभारप्रदर्शन दत्ता कांबळे यांनी पाहिले.








Be First to Comment