सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी 8डिसेंबर रोजी रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला असून खालापूर खोपोलीतून व्यापारी असोसिएशन पांठिबा दिला आहेया बंदला पांठिबा देण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या वतीने मंगळवार दि.८ डिसेंंबर खोपोली बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यादरम्यान खोपोली बंदच्या पार्श्वभूमिवर नगरपालिकेच्या गटनेत्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसुरकर, शिवसेना शहर प्रमुख तथा गटनेते सुनिल पाटील, शेकाप जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील,संतोष जंगम, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक मनेष यादव,मंगेश दळवी,युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील,सेनेचे उपशहरप्रमुख दिलीप पुरी,महिला संघटक प्रिया जाधव,सुरेखा खेडेकर, शेकापक्षाचे कैलास गायकवाड,शाम कांबळे,रविंंद्र रोकडे,मा.उपनगराध्यक्ष रमेश जाधव,काँग्रेस शहर अध्यक्ष रिचर्ड जाँन, खोपोली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कांतिलाल पोरवाल,शिळफाटा व्यापारी नंदूशेठ ओसवाल,राजू अभाणी,रिक्षा संघटनेचे किशोर सुतार,भाजी मंडईचे मयुर पोखरकर यांच्यासह उपस्थित होते.

खोपोली बंद संदर्भात खोपोली व्यापारी संघटनेच्या असमर्थ दखवत कृषी कायदा शेतकऱ्यांविरोधात कसा असा सवाल करीत खोपोली बंदमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल का असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला असता शेतकऱ्यांच्या भल्याचा कायदा कसा याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी शाम कांबळे यांनी केली असता व्यापारी गोंधळात पडले होते.तर व्यापाऱ्यांंनी बंदला पाठिंबा देण्यासाठी शहर प्रमुख सुनिल पाटील,युवक अध्यक्ष अतुल पाटील, शेकापक्षाचे किशोर पाटील,कैलास गायकवाड,रविंद्र रोकडे यांनी विनवणी केल्यावर दत्ताजीराव मसुरकर यांनी मध्यस्थी करीत खोपोली बंदसाठी पांठिबा दर्शवली आहे.








Be First to Comment