Press "Enter" to skip to content

आंबेवाडी नाका येथे झाकण नसलेले गटार : नागरीकांच्या जिवाला धोका

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड आंबेवाडी नाका येथील गटार लाईन वर झाकण न बसवल्यामूळे या बाजार पेठेतून येजा कारणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाका येथील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेनी असणारी या गटार लाईनचे काम गेली एक वर्षा पासून सुरु असुन हि गटार लाईन काही ठिकाणी पूर्ण झाली आहे.तर काही ठिकाणी या गटार लाईनचे काम सूर आहे.परंतुु पूर्ण झालेल्या गटार लाईनवर झाकण न बसवल्यामूळे येथुन येजा करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.तसेच या गटार लाईनला झाकण नसल्याने यात कचरा टाकला जात आहे.या काचऱ्याच्या दुर्गंधीमूळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

या गटार लाईनच्या दोन्ही बाजुला किराणा स्टोअर्स, स्वीट मार्ट,पेपर एजन्सी,पान शॉप, कापड दुकान, मोबाईल शॉपी, हार्डवेअर ,ज्वलर्स, फोटो ग्राफर्स,मटण शॉपी, दवाखाने, मेडिकल,बँका, पुस्तके विक्रेते,फळ विक्रेते व इतर विविध प्रकारची दुकाने आहेत. यामुळे विविध प्रकारच्या वस्तु खरेदीसाठी असंख्य नागरिक ये जा करीत असतात शिवाय या गटाराच्या लाईनवर झाकन न बसवल्यामूळे याला पर्याय म्हणून फळ्या टाकल्या आहेत.या फळीवरुन एक ग्राहक जात असतांना फळी मोडली.परंतुु दैव बलवत्तर म्हणून ग्राहक थोडक्यात बचावला.त्याला किरकोळ इजा झाली. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली दहा ते अकरा वर्षापासून सुरू असून या कामात कोणतीही गती नाही शिवाय ठिक ठिकाणी कामे सुरू केली आहेत.

सध्यास्थितीत ही कामे अर्धवट असलेली दिसून येत आहेत.परंतु यामुळे कोणाचा नाहक बली गेला तर याला जबाबदार कोण? तसेच आंबेवाडी नाका येथे गटार लाईनवर लवकरच. लवकर झाकण बसवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आबा शिंदे यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.