महाविकास आघाडी सरकारने कोळी बांधवांना मदतीच्या नावाने दाखविला ठेंगा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन ।
2020 या सालात कोरोना तद्नंतर जूनच्या 3 तारखेला निसर्ग चक्रीवादळ सारखी अनेक वादळे आली असल्याने त्यात कोळी बांधवांचे नुकसान झाले. ःत्यामुळे त्याची पूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली. मात्र विद्यमान महाविकास आघाडी सरकारने माझ्या मच्छिमार बांधवाना नुकसानभपाई म्हणून ठेंगा दाखविला आहे.असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी कोळी महासंघातर्फे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील हरेश्वर मैदानात मच्छीमार बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण देरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, माजी मंत्री व आमदार रविशेठ पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, आमदार निरंजन डावखरे, भाई गिरकर, भाजप मच्छीमार सेलचे अध्यक्ष अॅड. चेतन पाटील, कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, राजहंस टपके,भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, भालचंद्र वरसोलकर, मनोहर बैले,अमृत चोगले,राजेंद्र चुनेकर,माणिक बळी ,रेवदंडा उपसरपंच मंदा बळी आदी उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर आम्ही जेव्हा या विभागाचा दौरा गेला तर कोळीवड्याची दयनीय अवस्था झाली होती. एका मच्छिमार बांधवाने सांगितले की,होडीच्या वरती लावण्यात येणाऱ्या ताडपत्रीचा खर्च हा सुमारे पंचवीस ते तीस हजार इतका येतो मात्र सरकारने मदत द्यायची ठरवली तर हातात देईल हजार पाचशे.त्याचप्रमाणे अनेकांच्या व्यथा ऐकल्या आणि बघितल्यासुद्धा.आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून परिस्थिती कथन केली, मात्र महाविकास आघाडी सरकारने कोळी बांधवांना मदतीच्या नावाने ठेंगा दिला. त्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी नेमलेल्या हरिदास कमिटीचा अहवाल दाबून ठेवला. या सरकारने कोळी बांधवांची फसवणूक केली आहे, असेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोळी महासंघाचे नेते तथा आमदार रमेश कोळी यानी ठरविले की,सरकार मदत करीत नसेल तर आमी कोळी महासंघाच्या वतीने जेवढी क्षमता आहे तेवढी मदत करू.त्यानुसार आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेळी मच्छीमार समाजातील दोन हजार लाभार्थ्यांनाशितपेटी,टब,बॅटरी आदी साहित्यासहित धनादेशही वाटप करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, यंदाच्या वर्षात अनेक वादळे आली आणि कोळी बांधवांचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळातही मोठे नुकसान झाले.शेतकर्याप्रमाणे कोळी बांधवदेखिल अन्नदाते आहेत. त्यामुळे शेतकर्यांप्रमाणे त्यांनादेखील मदत मिळणे आवश्यक आहे असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले, मात्र या सरकाने काहीच केले नाही. त्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली.
कोळी बांधवांना जातवैधता प्रमाणपत्र देता यावे यासाठी मी मुख्यमंत्री असताना हरिदास कमिटी नेमली होती. या कमिटीने आपला अहवाल दिला, परंतु निवडणूक आचारसंहिता लागली. त्यामुळे या अहवालाची अंमलबाजणी करता आली नाही. त्यानंतर सरकार बदलले. महाविकास आघाडी सरकारने हा अहवाल जाणीवपूर्वक दाबून ठेवला आहे, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.

हरिदास कमिटीचा अहवाल लागू करण्यात यावा यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आम्ही आवाज उठवू. आरसीएफ, ओएनजीसी, जेएसडब्ल्यू या कंपन्यांकडून कोळी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल मी स्वतः पुढाकार घेऊन लवकरच बैठक आयेजित करेन, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे केंद्रात मच्छजलसंपदासाठी मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. जो दर्जा शेतीला आहे तोच दर्जा मासेमारीला मिळाला आहे. केंद्राने मच्छीमारांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यांची माहिती मच्छीमारांना देण्यासाठी एक शिबिर आयोजित करा, असे आवाहन फडणवीस यांनी या वेळी केले.
मच्छीमारांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना ताकद दिली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्यदेखील दिले पाहिजे. त्याकरिता एक यंत्रणा उभी केली जाईल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळात मच्छीमारांचे नुकसान झाले, मात्र त्यांना राज्य सरकारकडून मदत मिळाली नाही. अनेक जेट्ट्यांची कामे अर्धवट आहेत. महाविकास आघाडी सरकार काहीच करीत नाही, अशी नाराजी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी व्यक्त केली.
रायगडातील मच्छीमारांची जी परिस्थिती सत्तरच्या दशकात होती तीच आज ही आहे. काही मच्छिमार मला भेटले त्यांनी सांगितले की 142 वेळा मंत्रालयाच्या पायऱ्या झिजविल्या तरी जेट्टीचे काम झाले नाही.मात्र त्यावेळी मी एक पत्र लिहिले आणि तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते.त्यांना ते पत्र दिले आणि त्यांनी ताबडतोब42 कोटींची जेट्टी मंजूर करून ती बांधून सुद्धा पूर्ण झाली आहे. राजकीय नेतृत्वाने नेहमीच मच्छीमार समाजाची फसवणूक सत्ताधारीयांनी केली आहे.2018च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या आदेशानुसार अलिबाग मुरुडचा विधानसभेचा आमदार हा केवळ भाजपच्या मतावर निवडून आला आहे.त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत केली मात्र ते निवडून आले अन आमची फसगत झाली. यापुढे तसे होऊ देणार नाही. 2014 साली अलिबागचा आमदार कोळी समाजाच असेल, अॅड. चेतन पाटील प्रास्ताविकात म्हणाले असता एकच हास्य कल्लोळ उडाला. मत्स्यव्यवसाय विभागात हा देशात नंबर एकचा विभाग असताना तो आता चार नंबर वर गेला आहे. असेही अॅड.चेतन पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment