सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । विकास पाटील ।
सातारा जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंतांची आर्थिक अडचण होवू नये म्हणून त्यांना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीत माण तालुक्यातील बिजवडीचे तुकाराम काकासो भोसले व कोळेवाडीचे ह.भ.प.सुभाष घाडगे महाराज यांची कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घाडगे यांची मानधन कलावंताच्या समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे
कोळेवाडी ( ता . माण ) येथील सेवासूर्य आश्रमाचे संचालक ह . भ . प . सुभाष पांडुरंग घाडगे २५ वर्ष किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करत आहेत. त्याच बरोबर सेवासुर्यआश्रमाच्या माध्यमातून माऊली दिंडी सोहळा , वृक्षारोपण , परिसर स्वच्छता आदी अभियानातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो . या निवडीबद्दल त्यांचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , प्रभाकर देशमुख , प्रभाकर घार्गे , जि . प.चे उपाध्यक्ष प्रदीप विधाते , महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ , खटावचे माजी सभापती संदीप मांड, खटावचे माजी सभापती संदीप मांडवे आदींसह माण खटाव तालुक्यातील राजकीय , सामाजिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी ह . भ . प. सुभााष घाडगे यांचे अभिनंदन केले .
या जिल्हास्तरीय कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी प्रताप गंगावणे तर सदस्यपदी यशवंत गाडे , आनंदराव भिसे , आनंदा भोसले , सुहास फडतरे यांची निवड करण्यात आली आहे .








Be First to Comment