सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।
गेली ३५ वर्षांपासून रखडलेल्या पिण्याच्या प्रश्नाकडे आमदार महेंद्र शेठ दळवी व अलिबाग शिवसेना प्रमुख राजाभाई केणी यांनी दिले जातीने लक्ष
अलिबाग आर.सी.एफ साठी १९८४ साली म्हणजेच जवळ जवळ ३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कुर्डूस, कुसुंबळे व श्रीगाव या गावांतील ग्रुपग्रामपंचायत हद्दीमधून पाण्याची लाईन टाकण्यात आली होती.
परंतू ‘धरण उशाला आणी कोरड घशाला’ अशीच काहीशी अवस्था या गावांची झाली आहे. कारण आजतागायत गेली ३५ वर्षे उलटून गेली तरी मात्र वरील ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी बांधव पिण्याच्या फ़िल्टर पाण्यापासून वंचित आहेत. कारण सद्यस्थितीत येणारे पिण्याचे पाणी हे अतिशय खराब येत असून ते पिण्यायोग्य तर नाहीच परंतू त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण देणारे मात्र नक्कीच आहे.
परंतू या गंभीर प्रश्नाकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष होत आहे ही बाब लक्षात घेवुन शेतक-यांवर होणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व त्यांच्या हक्काच्या महत्वपूर्ण गरजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवानेता व अलिबाग शिवसेना तालुका प्रमुख राजाभाई केणी यांनी पुढाकार घेतला व आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील ३७ गावांना व त्याअंतर्गत येणा-या अनेक आदिवासीवाडयांना फ़िल्टर पाणी मिळावा यासाठी नुकतेच महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री मा. सुभाषजी देसाई यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी लवकरच फ़िल्टर पाणी उपलब्ध करुन देवू असे आश्वासन उद्योगमंत्र्यांकडून देण्यात आले. यावेळी शेतक-यांच्या शेतांमधून अलिबाग आर.सी.एफ साठी फ़िल्टर पाणी उपलब्ध व्हावा म्हणून पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकण्यात आले मात्र ज्यांच्या शेतांमधून हे पाईप टाकण्यात आले ते शेतकरी मात्र फ़िल्टर पाण्यापासून वंचित आहेत ही बाब अतिशय निंदनीय व अन्यायकारक आहे ज्याकडे लवकरात लवकर जातीने लक्ष देण्यात यावे असे वक्तव्य अलिबाग शिवसेना तालुका प्रमुख राजाभाई केणी यांनी यावेळी केले.








Be First to Comment