Press "Enter" to skip to content

गणेश भक्तांनी घेतले महडच्या वरदविनायकाचे दर्शन

संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साकारली गणपती, कोरोना योद्धा ची रांगोळी

रंगच्छंद कलाकार पनवेल यांची रांगोळी तरुणाईच्या मोबाईल मध्ये कैद

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

मुंबई पुणे महामार्गावर हे अष्टविनायका पैकी असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर ,चौक, खोपोली ,कर्जत , पनवेल ,रसायनी या परिसरातील भक्तांनी आपल्या लाडक्या वरद विनायकाचे दर्शन घेतले.

कोरोना मुळे अनेक महिने मंदिर बंद होती. मंदिर उघडण्यासाठी परवानगी मिळाल्यामुळे अनेक भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले.त्याच बरोबर आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने सुंदर अशी मनमोहक रांगोळी रंगच्छंद कलाकार पनवेल यांच्या माध्यमातून काढण्यात आली. गेले अनेक महिने कोरोना योद्धा म्हणून काम करीत असलेले पोलीस,डॉक्टर,सफाई कर्मचारी यांची रेखाचित्रे रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली तसेच,गणपती बाप्पाचे सुद्धा सुंदर शी रांगोळी साकारण्यात आली विशेष म्हणजे या कोरोनांच्या महामारीत प्रत्येक जण कोरोना योद्धा सारखेच काम करीत होते मात्र.पोलीस,डॉक्टर,सफाई कर्मचारी यांचे कार्य अतुलनीय होते.ते करीत असलेल्या कामाची दखल रंगच्छंद कलाकार पनवेल यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली.

१२/१५ फुट तसेच २० किलो रांगोळी, आणी दहा तास पेक्षा जास्त वेळ आणी विविध प्रकारचे कलर्स वापरून हे रेखाचित्र रांगोळीच्या माध्यमातून काढण्यात आले. गेले काही दिवस वातावरणात गारवा असल्यामुळे आज संकष्टी चतुर्थी च्या दिवशी गणेशभक्ता मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते दर महिन्याला संकष्ठी चतुर्थी तसेच सहा महिन्यातून येत असलेली अंगारकी चतुर्थी येत असल्याने अनेक भक्त गण दर्शन घेण्यासाठी येत असतात.वरद विनायक म्हणजे इच्छा पूर्ती करणारा अशी श्रद्धा अनेक भक्तांची असल्यामुळे अनेक भक्तगण मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने रांगेत उभे राहून या वरद विनायकाचे दर्शन घेत असतात.

या संकष्टि चतुर्थी च्या निमित्ताने रांगोळी ( रंगच्छंद कलाकार पनवेल) यांनी साकारली रांगोळी चे सुंदर असे दृश भक्तगणांनाचे मन आकर्षिले जात होते .आणि आपल्या जवळ असलेल्या मोबाइल मध्ये टिपण्याचा प्रयत्न करीत होते.अशीच सुंदर रांगोळी रोशन पाटील,अजय मोकल,गीतेश पाटील,रोहित भोईर,शुभम कुमरे ,अमोल खानावकर ,सुशील बुटाला, रवींद्र चौधरी , संदेश आमले, तेजस म्हात्रे ,प्रशांत पाटील ,शैलेश पाटील , राज पाटील,मयूर म्हात्रे,राजेंद्र पाटील यांनी साकारली होती

यावेळी आपल्या सुमधुर वाणीतून यातनाही झेलल्या,वेदनाही सोसल्या तितक्याचं तरी जंग अजूनही संपलेली नाही.. किती घाव झेलले,किती दुःख सोसले तरी लाट संकटाची अजूनही सरलेली नाही.. कृपादृष्टी विनायका,लेकरांवर अशीच सदैव राहू दे, झुंजण्या या विषाणुशी असेच बळ लाभु दे..ही चारोळी या कलाकारांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.