Press "Enter" to skip to content

वाकण येथे प्रवाशांना सोसावे लागत आहेत ऊन्हाचे चटके

तात्पुरती शेड उभारण्याची प्रवाशांची मागणी

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

मुंबई -गोवा महामार्गावरील वाकण नाका हा अंत्यत महत्वाचा नाका मानला जातो. अष्टविनायकापैकी पाली येथील श्री. बल्लालेश्वर गणपती मंदिर तसेच पर्यटनस्थळ असलेल्या मुरूड-जंजीरा व श्रीवर्धन कडे जाण्यासाठी वाकण नाक्यावरुनच जावे लागते. पंरतु महामार्गाचे काम सुरु झाल्यापासुन येथे महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना वाहनांची वाट बघत उभे राहण्याच्या ठिकाणी प्रवाशी शेड नसल्यामुळे सद्यपरिस्थितीत प्रवाशांना ऊन्हाचे चटके सहन करित तसेच मोठ्या प्रमाणात उडणा-या धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतांना दिसत आहे.

महामार्गाचे काम सुरु झाल्यापासुन वाकण नाक्यावरती वाहनांची वाट बघत उभे राहणा-या प्रवाशांना प्रवाशी शेड नसल्यामुळे वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात ऊन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. सुरुवातीच्या काळावधीत महामार्गाच्या बाजुला असणा-या झाडांच्या सावलीचा आधार प्रवाशांना ऊभे राहण्यासाठी असायचा. पंरतु महामार्गाच्या कामासाठी संपुर्ण झाडे तोडण्यात आल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तसेच सद्यपरिस्थितीत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशी वर्गांला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच महामार्गावरील खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात ऊडणा-या धुळीचे कण हे प्रवाशांच्या नाकामध्ये व डोळ्यांमध्ये जाऊन विविंध आजार उद्भवत आहेत.

दरम्यान वाकण नाक्यावरती तात्पुरती का होईना महामार्गाच्या दोन्ही बाजुला प्रवाशांना ऊभे राहण्यासाठी काही तरी पर्याय काढुन प्रवाशी शेड उभारण्यात यावी अशी मागणी प्रवाशीवर्गांतुन व नागरीकांकडुन जोर धरत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.