जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी शिवसेनेचा जन्म आहे : मा.आ. मनोहर भोईर
गिरवले गाव शिवसेना मय झाले, आता विकासाची गंगा पहा : बबनदादा पाटील
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।
तालुक्यातील गिरवले गावातील ग्रामस्थांनी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होवून मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल उरण विधानसभेचे मा.आ.मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी आपण कशा पद्धतीने शिवसेना रायगड जिल्ह्यात वाढविली, किती संकटे अंगावर घेतली, आणि शिवसेनेच्या माध्यमातून केलेली जनसेवा, विकासकामे याचा आलेखच जनसमुदायासमोर मांडला.

उद्धव ठाकरे संयमी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी कोरोनासारख्या महामारित महाराष्ट्रासह मुंबईला वाचविले. धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाला आवर घालण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जरी शिवसेना पक्षाचे असले तरी ते कधीही पक्ष म्हणून मुख्यमंत्री राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्री म्हणून ते काम करीत असतात. अधिकाऱ्यांसोबत बोलाविलेल्या बैठकीमध्ये ते कधीही अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसत नाहीत, तर तो त्यांचा सन्मान आहे तो त्यांना मिळालेच पाहिजे असे सांगत नागरिकांसह शासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करणारे मुख्यमंत्री आहेत असेही बबनदादा म्हणाले.

यावेळी मा.आ.मनोहर शेठ भोईर यांनी सांगितले की, आपल्या गिरवले गावासह अनेक ठिकाणी आमदार असताना विकासकामे केली आहेत. रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले, आणि फुकटचे श्रेय लाटण्यासाठी स्थानिक आमदार सरसावले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हे योजनेचे नाव आहे, मात्र तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात ही सर्व कामे आपलीच आहेत असे खोटे सांगून यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र जनतेने याबाबी लक्षात घ्यायला हव्यात.
मी कधीही माझा वाढदिवस साजरा करीत नाही, मात्र या काळात माझ्याच वाढदिवशी १२ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले, आणि गरजूंना त्या रक्ताची मदत होण्याकरिता विशेष प्रयत्न केले.

यावेळी गिरवले गावातील शिवसेनेत प्रवेश केलेल्या तरुणांना तसेच ज्येष्ठांना प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी माऊली बारगे, परेश पाटील, संतोष ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरवले गावातील शेकडो ग्रामस्थांनी शिवबंधन आपल्या मनगटावर बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.








Be First to Comment