Press "Enter" to skip to content

हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र लढ्याची माहिती शालेय पुस्तकात द्या

वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच तर्फे मागणी

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।


वीर हुतात्मा भाई कोतवाल यांची १०८ वी जयंती भाईंच्या जन्मगावी माथेरान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १डिसेंबर १९१२ रोजी क्रांतिसूर्य विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांचा जन्म माथेरान या निसर्गरम्य गावी झाला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या हौतात्म्याने प्रेरित होऊन भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य लढ्या मध्ये उडी घेतली भाईंनी आझाद दस्ता नावाची संघटना काढून तरुणांची फौज ब्रिटिशांविरोधात तयार केली होती. एकतर स्वातंत्र्य किंवा स्वर्ग या उद्देशाने इंग्रजांन विरोधात भाईंनी लढा दिला.

वीर हुतात्मा भाई कोतवाल विचारमंच चे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी भाईंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले , मंगेश शिंदे, विजय कदम , विठ्ठल पवार व बिलाल महाबले यांनी स्वतंत्र सैनिकांच्या स्तंभास पुष्पहार अर्पण केला. विचारमंच चे उपाध्यक्ष प्रकाश सुतार भास्कर शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले

मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात शिक्षण विभागाने भाई कोतवाल यांच्या स्वातंत्र्य लढ्याची सविस्तर माहिती देणाऱ्या धड्याचा समावेश करण्याची मागणी विचारमंचचे सचिव सुनिल शिंदे यांनी केली . जेणेकरून भाईंच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीस मिळू शकेल.

सदर अभिवादन कार्यक्रमात विचारमंचचे उपसचिव सर योगेश जाधव, माजी नगरसेवक संतोष लखन,मुकुंद रांजाणे, मनोज चव्हाण, दीपक डोईफोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.