केलवणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत आणी कार्यकर्त्यांनी केला पाठपुरावा 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔶🔷🔷
देश स्वतंत्र झाल्यापासून माडभुवन आदिवासीवाडी रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे.अनेक वर्ष पाठपुरावा करूनही वन विभागाकडून परवानगी मिळत नव्हती.यासाठी केलवणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी पाठपुरावा सुरू केला.त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच समाज सेवक रत्नाकर घरत ,युवासेना विभाग अधिकारी स्वप्नील भोवड ,शाखा प्रमुख लक्ष्मण बावधाणे,माजी पंचायत समिती सदस्य गणेश सावंत यांच्या अथक परिश्रमातून माड भुवन आदिवासीवाडी रस्ता आता प्रगतीपथावर आहे.
काकडी ,शिरवली , दुधी ,नाचणी आदी प्रकारचे भाजीपाला , कडधान्य पिकवून आपला उदर निर्वाह करणाऱ्या आदिवासीबांधवांना रस्त्याची व्यवस्था नसल्याने डोंगरातून पायवाटेने प्रवास करत असताना घसरुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर आजारी रुग्णांना डोली करून खाली उतरावे लागते.यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी आदिवासी समाजाला हा रस्ता तयार झाल्यानंतर विकासाकडे वाटचाल करता येणार असल्याचे मत व्यक्त केले.
या आदीवासी बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन वन विभागाने वेळीच तत्परता दाखवली व सर्वे करून घेतला.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य बुधाजी दोरे , शनिवार उघडा , काशिनाथ शिध , चांगा उघडा ,महादेव लेंडे , किसन दामा शिद , हिर्या लेंडे , गोरख लेंडे , जनार्दन लेंडे आदी उपस्थित होते








Be First to Comment