Press "Enter" to skip to content

पर्यावरण प्रेमीनी घेतला वसा निसर्ग संवर्धनाचा

सारडे विकास मंच संस्थेने कोमनादेवी पायथ्याशी लागवड केलेल्या वनराईला दिली नवसंजीवनी

🔶🔷🔶🔷

संत तुकारामांनी आपल्या अभंगात वर्णन केलंय वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे !.. पक्षी ही सुस्वरे आळविती !!..
वनसंपदा हि पर्यावरणाचा आत्मा आहे आणि पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवयाचा असेल तर एकूण जमिनीच्या ३३ टक्के भूभाग हा वनाच्छादित असायला हवा हा शास्त्राचा नियम आहे.पण आज आपल्या भारतात फक्त ११ टक्केच जंगल शिल्लक राहिले आहे म्हणून आज प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक बांधिलकी जपत आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून कमीत कमी एक तरी झाड लाऊन त्याच संगोपन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लावायला हवा.आणि जे वृक्षांवर आणि प्राणिमात्रांवर प्रेम करतात ते जीवनावरही रसरसून प्रेम करतात…आणि अश्याच सामाजिक कार्याबरोबर निसर्ग संवर्धन आणि संगोपनाच्यां प्रामाणिक कार्यानं आजूबाजूच्या परिसरात नावारूपाला आलेली संस्था म्हणजेच … सारडे विकास मंच या संस्थेच्या माध्यमातून कोमनादेवी पायथ्याशी लागवड केलेल्या वनराईत कुणी अज्ञाताने लावलेल्या वणव्या नंतर लगेचच त्या वृक्षसंपदेला नवसंजीवनी देण्याकरिता आणि त्यांच संरक्षण करण्याकरिता श्रमदान करून ह्या नटलेल्या वनराईतील वृक्षांना घोषवाक्याचें टॅग ( स्लोगन्स स्टिकर्स ) लावण्याचं काम आणि पाणी देऊन मशागत करण्याचं कार्य करण्यात आलं.

विविध प्रकारच्या घोषवाक्यांच्या टॅग लावल्यामुळे होते काय तर एकतर ह्या झाडांना कुणीही तोडण्या पासून संरक्षण मिळतं आणि निसर्गप्रेमींना चांगल्या घोषवाक्यांच्यां चार ओळी वाचायला मिळतात आणि त्यामुळे निसर्गाप्रति आपुलकी आणि प्रेम निर्माण होतं.
ह्या घोषवाक्यांचें टॅग बनाविण्या करीता आलेला आर्थिक खर्च… गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे सदस्य …आणि …सारडे विकास मंच चे …हितचिंतक… श्री अनिल जी घरत ( पिरकोन )… यांच्या तर्फे मदत निधी म्हणून १,००० ( एक हजार ) रुपये…सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र जी म्हात्रे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.

हि रक्कम प्रतापगड स्वच्छता अभियाना दरम्यान श्रीमंत कौशिक जी ठाकूर सर यांनी प्रवासादरम्यान विचारलेल्या एका प्रश्नमंजुशेचं अचूक उत्तर दिल्या बद्दल श्री अनिल जी घरत यांना मिळालेल्या बक्षीस रुपातली होती ती त्यांनी एका समाजपयोगी कार्यासाठी समर्पित केली.
या वनराईतल्या वृक्षसंपदेला वाचविण्या करीता,तिला पुन्हा बहर यावा या करीता आज श्रमदान करण्यात आलं त्या श्रमदानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले ते सारडे विकास मंच चे…. श्री नागेंद्र जी म्हात्रे, श्री रोहित जी पाटील,श्री संपेश जी पाटील, …गोल्डन ज्युबली मित्र मंडळ चे …श्री अनिल जी घरत, श्री नवनीत ( विकी भाई ) पाटील, पिरकोन गावचे श्री समाधान जी पाटील,प्रतिक्षा दीदी म्हात्रे, धनेशा दीदी पाटील, रिया दीदी म्हात्रे,आणि चिमुकले छोटे सरदार यांच्या श्रमदानातून आज एक मनाला आत्मिक समाधान देणारं कार्य संपन्न झालं.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.