उसनवारीचे पैसे मागितल्याचा आला राग : काशीदच्या समुद्रात बुडवून केला खून 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔷🔶🔷🔶
उसने दिलेली रक्कम मागितली याचा राग येऊन रक्कम देणारा गणेश किसन ठोकळ (रा.कामरगाव ता.अहमदनगर जि.अहमदनगर) यांस सहाजणांनी मिळून मुरूड तालुक्यातील काशीद येथील समुद्रात बुडवून खून केल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 27/11/2020 रोजी 12.24 वा. मुरुड पोलीस ठाणे येथे मुरुड पोलीस ठाणे येथे गु.र.नं.54/2020 भा.दं.वि.क. 302, 120 (ब), 34 या प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यातील मयत गणेश किसन ठोकळ रा.कामरगाव ता.अहमदनगर जि.अहमदनगर याने माहे ऑगस्ट 2019 मध्ये त्याचे राहते गावी आरोपी क्र.5, राहणार- कला मुंडवाल, पो. फतेहउल्लाहपुर, जि. गाझीपुर, उत्तरप्रदेश यास एक लाख रूपये उसनवारी दिले असता ते मयत याने परत मागितले असता त्याचा मनात राग ठेऊन आरोपी क्र.1 ते 6 यांनी आपसात संगणमत व कटकारस्थान रचुन दिनांक 06/09/2020 रोजी मौजे काशीद बिच ता.मुरुड येथे मयत यांस फिरण्यासाठी सोबत घेऊन जाऊन 14.00 ते 15.00 वा.चे दरम्यान समुद्राच्या काठी नेऊन पाण्यात पोहत असताना आरोपींनी मयत यास समुद्राचे पाण्यात बुडवुन त्याचा खुन केला.
याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गु.र.नं.54/2020 भा.दं.वि.क. 302, 120(ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री.परशुराम कांबळे हे करीत आहेत.








Be First to Comment