Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत यांचे शेलघर येथे चौथे कार्यालय

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या चौथ्या जनसंपर्क कार्यालयाचे सौभाग्यवर्तींच्या शुभहस्ते उद्घाटन ! 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । उलवे । प्रतिनिधी । 🔷🔷🔶🔶

कामगारांचे राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत असलेले झुंजार कामगार नेते महेंद्रजी घरत यांचा दांडगा जनसंपर्क आहे तसेच सिडको, जे.एन. पि. टी. राष्ट्रीय महामार्ग बाधित प्रकल्पग्रस्त शेतक-्यांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने लढत असणारे एकमेव नेते म्हणजे महेंद्र घरत.

त्यांच्या कामाचा पसारा व व्याप्ती वाढलेली आहे म्हणून पनवेल – उरण – मुंबई या तीन ठिकाणी अतिशय प्रशस्त व भव्य – दिव्य असे संपर्क कार्यालये कार्यरत आहेत. तर उलवा नोड मध्ये सुखकर्ता शेलघर, येथील चौथे कार्यालय जनसंपर्कासाठी तयार करण्यात आले आहे. महेंद्र घरत यांच्या सौभाग्यवती सौ. शुभांगीताई घरत यांना या नूतन कार्यालयाच्या उद्धघाटनाचा मान यात आला.

कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेला महेंद्र घरत यांचा परिवार

महेंद्र घरत या वादळाबरोबर गेल्या २८ वर्ष समर्पक अशी साथ त्यांनी दिलेली आहे. किंबहुना महेंद्र घरत यांच्या राजकीय – कामगार – आर्थिक – सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर – नेत्रदिपक कामगिरी मध्ये सौ. शुभांगीताई यांचा सिंहाचा वाटा आहे.महेंद्र घरत यांनी लंडन येथील ITF या बलाढय संघटनेच्या लॉजिस्टिक विभागाच्या उपाध्यक्षपदी लावलेली मुहूर्त मेढ म्हणजे एक आगरी बच्याने अटकेपार फडकवलेली मराठी पताका आहे जगाची शीर्ष संघटना युनो च्या 10 परीषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. गेली 33 वर्ष अविश्रांतपणे गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी उपसलेल्या कष्टाचे हे फळ आहे.

उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही या उक्ती प्रमाणे गोरगरीब, श्रमिक, दलित जनतेच्या जीवनातील कष्ट, अडचणी मध्ये शेवट पर्यंत लढत राहणार आणि त्यासाठी शेकडो कार्यकर्ते महेंद्र घरत प्रमाणे निर्माण करून आपल्या साथीला हजारो हात निर्माण करण्याचे काम या ४ कार्यालयामधून जनसंपर्क, प्रशिक्षण, माहिती द्वारे केले जाणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.