आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने सर्वच्च तसेच उच्च न्यायलय येथे वकील नियुक्त करण्याची मागणी
🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । 🔷🔶🔷🔶
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच च्या माध्यमातून खालापुर तालुक्यातील असलेल्या कार्यकारिणी मंडळ,अध्यक्ष आणी सहकार्य यांनी खालापूर तालुक्यातील तहसीलदार इरेश चप्पलवार यांची भेट घेवून मराठा आरक्षण मिळावे तसेच ओबीसी च्या कोट्याला धक्का लागू नये तसेच ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने सर्वच्च तसेच उच्च न्यायलय येथे वकील नियुक्ती करणे.गेले अनेक वर्ष मराठा आरक्षण मिळावे यासाठी संबध मराठा समाज एका छत्रीखाली एकवटले असतांनाही त्यांस आरक्षणांसदर्भात सध्या मौन धारण होत असल्यामुळे मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यावे यासाठी हे निवेदन देण्यात आले.
मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे शासकीय नोकरीमध्ये भरतीचे प्रमाण अतिषय अल्प असल्यामुळे तसेच कोणत्याही सुविधा मिळण्यास विविध समस्या निर्माण होत आहे.मात्र मराठा आरक्षण आरक्षण हे ओबीसीच्या कोट्यातून न देता.ते स्वतंत्र पणे द्यावे मात्र ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देवू नये यामुळे हे आरक्षण कमी होईल त्याच बरोबर शिवाय हे आरक्षण संपविण्याचा दोन पातळीवर घाट घातला जात आहे. त्याच बरोबर मुंबई – दिल्ली च्या न्यायालयात विविध अर्ज करून सर्व ओबीसी यांना बाहेर काढण्याचा कट आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
ओबीसी यांना आरक्षण असल्यामुळे शासकीय नोकरी मिळत आहे त्याच बरोबर तसेच लाखो विद्यार्थी यूपीएससी,एमपीएससी पास होवून राज्य तसेच केंदात विवीध पातळीवर काम करी आहे.त्याच बरोबर डॉक्टर,इंजिनिअरिंग,वकील तसेच सीए झालेले आहेत.मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ते आमचे मत आहे त्यासाठी त्यासाठी ओबीसींच्या ताटातला घास पळविला जावू नये ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा बांधवांना वेगळे आरक्षण द्यावे ही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी संतोष दळवी – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद खालापूर तालुका अध्यक्ष, सुरेश गायकवाड- संघटक अविराज बुरुमकर ,नाना पाटील शुभम दळवी प्रमोद पवार,बिपीन भोसले संतोष पाटील ,जयेश ठाकूर, संतोष पारेंगे, मारुती पवार अदि निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.








Be First to Comment