महाराष्ट्रातील शेतक-यांकरिता प्रधानमंत्री फसल बिमा येाजनेची अंमलबजावणी
रायगड :भारत सरकारने २०२० च्या रब्बी हंगामासाठी रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, पालघर व भंडारा जिल्ह्यांमधील कर्जदार असलेल्या आणि नसलेल्या शेतक-यांकरिता प्रधानमंत्री फसल बिमा योजना (पीएमएफबीवाय)ची अंमलबजावणी करण्याचे अधिकार एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत अधिसूचित पीकांसाठी जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणा-या योजनेची माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.पीएमएफबीवाय योजना दुष्काळ, पूर, कोरडे गवत, भूस्खलन, चक्रीवादळ, तुफान, किटक, रोग व इतर अशा बाह्य धोक्यांमुळे पीक उत्पन्नासंदर्भात होणा-या कोणत्याही नुकसानांसाठी शेतक-यांना विमा संरक्षणाची सुविधा देते. उत्पन्नामधील नुकसान निश्चित करण्याच्या उद्देशासाठी राज्य सरकार योजनेसाठी अधिसूचित भागांमधील अधिसूचित पीकांवर क्रॉप कटिंग एक्स्पेरिमेण्ट्सची (सीसीई) योजना आखेल व त्याची अंमलबजावणी करेल. सीसीईनुसार करण्यात आलेल्या संशोधनामध्ये उत्पन्न डेटा कमी असल्याचे आढळून आल्यास शेतक-यांना उत्पन्नामध्ये नुकसान झाल्याचे मानण्यात येईल आणि यासंदर्भात क्लेम रक्कम देण्यात येईल.
ही योजना पेरणीपूर्वी, कापणी व कापणीनंतर अशा पीक चक्राच्या सर्व टप्प्यांदरम्यान येणा-या धोक्यांसाठी विमा संरक्षण देते. पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत सर्व उत्पादने कृषी विभागाकडून मान्यताकृत आहेत. रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, व भंडारा जिल्ह्यांमधील शेतकरी वर उल्लेख करण्यात आलेल्या पीकांसाठी पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्राप्त करण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यांमधील त्यांच्या संबंधित बँका, सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) यांच्याशी संपर्क साधू शकतात किंवा अधिकृत एजंट्सशी देखील संपर्क साधू शकतात. विमा संरक्षण मिळवण्यासाठी वैध कालावधीसंदर्भातील माहिती शेतक-यांसाठी कृषी विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवण्यासाठी पीकानुसार अंतिम तारीख वर देण्यात आलेल्या तक्त्यामध्ये सांगण्यात आली आहे.







Be First to Comment