सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔶🔶
रसायनीतील श्री समर्थ सामाजिक सेवाभावी संस्था गेली अनेक वर्ष जागतिक समस्या बनलेल्या एड्स आजाराची जनजागृती करुन या आजाराने बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करुन त्यांना योग्य उपचार देण्याचे कार्य करीत आहे.
दरवर्षी गरजू रुग्णांना दिवाळी सनानिमित्त मीठाई देण्यात येते त्याच प्रमाणे संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाटील हे भाऊबीज पासून वंचित महिलांना भाऊबीज करुन त्यांचा हा दिवस आनंदी करण्याचा प्रयत्न गेली 8 वर्ष करत आहेत यावर्षी देखील 15 बाधित महिलांना भाऊबीज करुन या बहीणींनां भाऊबीजेची भेट देण्यात आली.
एड्स आजार येऊन 40 वर्ष झाली तरी देखील समाजात या रुग्नांविषयी गैरसमज व कलंकित दृष्टिकोण आहे. तो दूर व्हावा या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातुन अरविंद पाटील जनजागृतीचे हे कार्य करीत आहेत.
माझ्या ह्या बहिंणीना भाऊबीजेची भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवन्याचे भाग्य मला लाभत आहे.असे अनेक रुग्ण एच.आय.व्ही.सह आपले खडतर जीवन जगत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे ते म्हणाले तसेच समाजातील सर्वांनीच एड्स आजाराने ग्रसितांचा द्वेष न करता त्यांना प्रेमाची वागणूक द्या आपण दिलेल्या प्रेमाने त्यांचे आयुष्य वाढन्यास फुलन्यास मदत होईल असे शेवटी अरविंद पाटील म्हणाले.








Be First to Comment