Press "Enter" to skip to content

राज्य सहकारी मध्यवर्ती संघटनांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔶🔷🔷

खालापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी यांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आज २६ नोव्हेंबर २०२० रोजी रॅली च्या स्वरूपात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार कल्याणी कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या मोर्चात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांचे महसूल, ग्रामविकास,निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती व इतर राज्य कर्मचारी यांनी आपल्या अनेक वर्षे प्रलंबित मागण्यांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून आज २६ नोव्हेंबर २०२० रोजी मोर्चा काढला.लाक्षणिक देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.राज्याच्या प्रत्येक तहसील कचेरीवर रॅलीचे आयोजन केले होते,अशी माहिती खालापूर संघाचे अध्यक्ष गोवर्धन माने व सरचिटणीस अमोल बोराटे यांनी दिली.

१९८२ ची जुनी पेन्शन लागू करणे,कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत रुजू करणे,सर्व विभागातील रिक्त पदे भरणे,अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या तात्काळ भरणे,समान काम समान वेतन या तत्वावर कंत्राटी कर्मचारी यांना ₹२६०००/- वेतन देणे,कामगार व कर्मचारी विरोधी कायदे रद्द करणे, मुदतपूर्व सेवा निवृत्ती जाचक धोरण रद्द करणे,केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय ठरणारे सर्व भत्ते लागू करा,वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्यासंदर्भात बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करा,प्रत्येक गरजुला मनरेगा मार्फत किमान २०० दिवसांचा रोजगार मिळेल असे धोरण लागू करा,ईतर सर्व प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी सर्व समबंधीत संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधीसोबत निर्णायक चर्चा करा अशा चौदा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना सादर करण्यात आले.

यावेळी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यात आले,कोविड ची काळजी घेतली ,अंतर ठेवून मोर्चा निघाला.मोर्चा नन्तर संविधान चे वाचन करण्यात आले व २६ नोव्हेंबर रोजी आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस,लष्करी अधिकारी,सर्वसामान्य जनतेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.