कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर शिरसे – आवळस गावांना समांतर मंजूर असलेला पुल निधीच्या प्रतीक्षेत 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔶🔶
स्वात्रंत्रोत्तर काळापासून कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर शिरसे – आवळस गावांना समांतर नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती या मागणीचा विचार करून तत्कालीन आमदार सुरेश लाड यांनी नाबार्ड अंतर्गत या कामास मंजुरी मिळून घेतली होती. तसेच या याकामासंबंधी स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यास मोलाचे सहकार्य रा.जि.प उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांनी केले . परंतु आता या कामास निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम सुरु होऊ शकले नाही.
कर्जत शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं आवळस गाव. परंतु उल्हास नदीवर शिरसे – आवळस गावांना समांतर पूल नसल्याने नागरिकांना 8 – 10 किमीचा वळसा मारून प्रवास करावा लागतो. याचा सर्वाधिक त्रास हा आजारी रुग्ण किंवा गरोदर माता भगिनींना दवाखान्यात नेत असताना होतो. पूल नसल्याने काही नागरिक वेळेत दवाखान्यात पोहचू शकले नाहीत, म्हणून त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काही नागरिक आपला वेळ वाचावा यासाठी पावसाळी भरलेल्या नदी पात्रातून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
तसेच दुसरा त्रास हा लहान चिमुकल्याना शाळेत जाताना होत आहे.
कालानुरूप शिक्षण व्यवस्था बदलत असल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी गावातील मुलांना कर्जत येथे जावे लागते.आणि या करीता 8-10 किमीचा वळसा मारून प्रवास करावा लागत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दड ही सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.
या परिसरातील राष्टवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ते गणेश पंढरीनाथ भोईर यांनी आपल्या माध्यमातून राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे,उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांना विनंती करतो कि आपण शिरसे – आवळस गावांना समांतर मंजूर असलेल्या पुलास निधी मिळावा व संबंधित कामाच्या प्रशासकीय कार्यवाही करण्यास संबंधित विभागास सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे.








Be First to Comment