धाटाव औद्योगिक वसाहतीच्या प्रदुषणाकडे प्रदुषण मंडळाचे दुर्लक्ष 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । रोहा । समीर बामुगडे । 🔶🔷🔶🔷
धाटाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक कंपन्यांकडुन होणा-या वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य व पर्यायाने जीवन धोक्यात आले आहे.शासन व प्रशासनाने याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हे प्रदुषण म्हणजे कायमचीच डोकेदुखी बनली आहे. वायुप्रदुषण तर आहेच परंतु या कपन्यांतुन सोडण्यात येणा-या पाण्याने जल आणि जमिन याचेही मोठया प्रमाणात नुकसान होत आहे,दमा खोकला यांसारखे आजार वाढुन येथील वैद्यकीय यंञणेवर ताण पडत आहे. मॉर्निंक वाॕकला जाणा-या नागरिकांना शुध्द हवे ऐवजी वायु मिश्वित हवेची भेट या कपन्यांतुन मिळत आहे, जसे चोर अंधाराचा फायदा घेतात त्याचप्रमाणे कंपन्यानी धुवक्याचा फायदा घेऊन वायुप्रदुषणात वाढ केली आहे.
याचा ञास लहान बालके व वृध्द मंडळी यांना फार होत आहे. या प्रदुषणामुळे नागरिकाना सकाळ – संध्याकाळी फिरणे मुश्कील झाले असुन येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही प्रदुषण मंडळ काहीही कारवाई करित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,वरिष्ठांनी तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा जर का येथे मोठा अनर्थ घडला तर त्याला प्रदुषण मंडळ जबाबदार असेल असे नागरिकाचे म्हणणे आहे.








Be First to Comment