सिटी बेल लाइव्ह । उरण ।घन:श्याम कडू । 🔷🔷🔶🔶
मुबंईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि दहशतवाद्यांशी दोन हात करून आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सर्वांना विनम्र आदरांजली आज द्रोणागिरी किल्ल्यावर नव परिवर्तन संस्थेतर्फे वाहण्यात आली.
मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र दहशतवादी हल्ल्याची भीती अद्याप मुंबईकरांच्या मनात कायम आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकार्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या सर्व शहीद बांधवांना द्रोणागिरी किल्ल्यावर संवर्धन करण्यासाठी जात असलेल्या नव परिवर्तन संस्थेतर्फे सुरुवातीलाच श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, हस्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, संस्थेचे अध्यक्ष विरेश मोडखरकर, उपाध्यक्ष घन:श्याम कडू, खजिनदार किशोर पाटील, प्रमोद माळी, प्रशांत ठाकूर, विनोद म्हात्रे, भूषण थळी आदींसह अनेकजण उपस्थित होते.








Be First to Comment