सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔶🔶
रोहा तालुक्यातील लांंढर हे मूळ गाव असलेले व सध्या पनवेल तालुक्यातील विहिघर येथील महालक्ष्मी सिटी मध्ये राहणारे ज्ञानेश्वर तुकाराम भगत (वय ३२) हे १९ नोव्हेंबर रोजी बाहेर जाऊन येतो असे त्यांच्या पत्नीला सांगून महालक्ष्मी सिटी येथील आपल्या घरातून बाहेर पडले होते. तेव्हापासून ते घरी पोचलेले नसतांनाच नागोठण्यात त्यांच्या एका नातेवाईक महिलेला ते दिसून आले. मात्र त्यांचा शोध घेतला असता ते नागोठण्यातही सापडले नाही. त्यामुळे नागोठणे पोलिस ठाण्यात ज्ञानेश्वर भगत हरविल्याची नोंद २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर भगत यांचा रंग सावळा, उंची ५ फूट ६ इंच, अंगाने मजबूत, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे, दाढी वाढलेली, अंगात सफेद रंगाचा व त्यावर राखाडी रंगाच्या पट्ट्या असलेला हाफ शर्ट, निळ्या रंगाची जिन्सची फूल पँट, काळ्या रंगाचे जॅकेट, पायात तपकिरी रंगाचे बूट अशा पेहरावातील ही व्यक्ती मोटारसायकल क्र. एम.एच. ४६ एम ८२०६ वरुन निघून गेली आहे. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळून आल्यास नागोठणे पोलिस ठाण्यात दूरध्वनी क्र. ०२१९४२२२०३४ तसेच पो.ना. जे.एच. पाटील मो.क्र. ७७२०९८१९०३ यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.








Be First to Comment