सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔶🔶🔷🔷
उरण घारापुरी येथील पूनम ओमप्रकाश धिंग्रा यांच्या बंद घरात घुसून सामानाची चोरी केल्याची घटना घडली. चोरीत ८ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची नोंद पोलीस स्टेशनला दाखल आहे.
पूनम ओमप्रकाश धिंग्रा यांचे कुटुंब नोकरी निमित्त अंबरनाथ येथे वास्तव्यास आहेत. त्यांच घर हे घारापुरीत आहे. ते घर बंद अवस्थेत असते याचाच फायदा उठवत चोरट्यांनी घराच्या छताचे पत्रे काढून आतमध्ये प्रवेश करीत घरातील स्टीलची टाक्या, ताटे, ग्लास, कळश्या, पितळी हांडे, ताटे, तांबे, चमचे, पातेले, गॅस सिलेंडर, शेगडी, फॅन, कुकर, बालदी आदीं ऐवज लंपास केला असल्याचे समजते. त्याची अंदाजे किंमत ८ हजार असल्याचे समजते.
याची तक्रार पूनम धिंग्रा यांनी मोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याविरोधात अज्ञात चोरट्यांविरोधात ४५४, ४५७ व ३८० कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मोरा पोलीस करीत आहेत








Be First to Comment