आधी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्या आणि मगच कंपनी सुरू करा
राजीप सदस्य ज्ञानेश्वर घरत यांची मागणी
जांभिवली वाडी येथील आदिवासी समाजातील शेतकरी बांधवाची जमीन एका कंपनीच्या उभारणी करता संपादित करण्यात आली आहे. कंपनी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले तरी सुद्धा शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही.शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने कंपनी व्यवस्थापना सोबत बैठक घेतली.सदर बैठकीत ज्ञानेश्वर घरत त्यांनी आधी मोबदला द्या मगच कंपनी सुरू करा अशी खणखणीत भूमिका मांडली. यावर सदर शेतकऱ्याला लवकरात लवकर मोबदला देण्याचे कंपनी व्यवस्थापनाचे वतीने मंजूर करण्यात आले आहे.
पाताळगंगा औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराची गरज पाहता रसायनी परिसरात अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक वसाहत झपाट्याने आकार घेऊ लागली आहे.याच प्रक्रियेत जांभिवली वाडी येथील आदिवासी समाजातील शेतकऱ्याची जमीन एच पी सी एल या कंपनी करिता संपादित करण्यात आली आहे. परंतु सदर शेतकऱ्याला आजही परिपूर्ण मोबदला देण्याबाबत वारंवार टाळाटाळ केली जात होती.अखेरीस शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेत कंपनी व्यवस्थापनाला शेतकरी बांधवांचा मोबदला लवकरात लवकर देण्याबाबत ठणकावले. यावेळी राजीप सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या सोबत जांभिवलीचे उपसरपंच श्री. आशोक कोंडीलकर, विभागीय चिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. दशरथ गायकर, जांभिवली ग्रामपंचायत सदस्य श्री. वामन कातकरी, व आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते.







Be First to Comment