सुदाम पाटील यांच्या दणक्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लागले कामाला
तीन कारखाने केले बंद तर तिघांना धाडली कारणे दाखवा नोटीस
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील दुर्गंधी प्रकरण
सिटी बेल / तळोजा
तळोजा औद्योगिक वसाहत आणि वादविवाद यांचे पूर्वाश्रमीचे नाते आहे.विविध असोसिएशन करून संघटित झाल्याने येथील कारखानदारांच्या मध्ये मग्रुरी वाढीस लागली आहे.कायदा फाट्यावर मारणे हा ते त्यांचा हक्कच समजतात.परंतु दुर्गंधी फौलावण्याच्या प्रकारात काँग्रेस चे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी मस्तावल कारखानदारांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
या प्रकरणाबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की 8 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी अत्यंत दुर्गंधी पसरू लागली.औद्योगिक वसाहती बरोबरच आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना त्याचा प्रादुर्भाव जाच देऊ लागला. झपाट्याने पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे लोकांना श्वास घेणे दुरापास्त होऊ लागले. कित्येकांना कोरड्या उलट्या, वांत्या असे त्रास होऊ लागले. हा प्रकार 9 ऑक्टोबर च्या पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होता. दुर्गंधी पसरल्यामुळे याठिकाणी झोपणे देखील कठीण झाल्यामुळे कित्येकांनी गाड्या काढून पनवेल,नवीन पनवेल, खांदा कॉलनी,कामोठे, खारघर अशा ठिकाणी जाऊन नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला.
या प्रकरणाबाबत सुदाम पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.संबंधित अधिकारी कारखानदारांना पाठिशी घालत असल्याचे निदर्शनास येताच सुदाम पाटील यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडे कैफियत मांडली.आदिती ताई तटकरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांना फैलावर घेताच तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी 23 नोव्हेंबर रोजी सुदाम पाटील यांना पत्र लिहून तीन कारखाने बंद केल्याचे तर तीन कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्याचे कळविले आहे.थोडक्यात सुदाम पाटील यांच्या दणक्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कामाला लागले असेच म्हणावे लागेल.
या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे मे.स्टार फिशरीज मिल, मे.अल्फाईझान अँड ग्लोबल मरीन,मे.कैरव केमोर्फोबे इंडस्ट्रीज या तीन कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत,तर हायकल केमिकल्स,मे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आणि महावीर केमिकल्स यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे.तर आय जी पी एल लिमिटेड या कंपनीला प्रस्तावित आदेश काढण्यात आले आहेत.
तळोजा औद्योगिक वसाहती मधील कित्येक कारखाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी व शर्ती अव्हेरत असतात.त्या विरोधात मी सातत्याने आवाज उठवत आहे.या प्रकरणात अदिती ताई यांनी लक्ष घातल्याने मस्तवाल कारखानदारांना अद्दल घडवू शकलो.अदिती ताईंनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे त्यांचे खूप खूप आभार.
सुदाम पाटील.कार्याध्यक्ष,पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी.








Be First to Comment