पञकारांचे तहसीलदाराना निवेदन 🔷🔷🔶🔶
कोरोनाची संभाव्य लाट असताना देखील शाळा सुरू होत असतील तर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी आणि पुढील उपचाराची सोय शासनाने करावी अशा मागणीचे पञ दिलासा फाऊंङेशन खालापूर आणि पञकारानी तहसीलदार व गटशिक्षण अधिकारी याना सोमवारी दिले.
कोरोनाबाधितांचा आकङा खालापूर तालुक्यात 2750 च्या घरात गेला आहे.122 जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाला.खालापूर तालुक्यात कोरोना बाधिंतासाठी सक्षम आरोग्य यंञणा नसल्याने रूग्णांची व नातेवाईकांची परवङ झाली होती.सध्या कोरोना रूग्ण सापङण्याचे प्रमाण कमी झाले असले तरि संभाव्य लाटेची शक्यतेने अनेकांची पायाखालची जमीन सरकली आहे.शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णयात पालकांचे संमतीपञ घेवून शासन जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शिवाय शिक्षक आणि शिक्षकेत्तर कोरोना चाचणी मोफत आणि विद्यार्थ्यांकङे दुर्लक्ष यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सोमवारी बहुसंख्य पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठवता शासन निर्णयावरिल राग दाखवून दिला.शासन जर संमतीपञ मागत असेल तर शासनाकङून देखील मुलाना कोरोना झाल्यास योग्य उपचाराची हमी द्यावी अशा मागणीचे लेखी पञ सोमवारी तहसीलदार इरेश चप्पलवार,प्रभारी गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब पोळ यांना देण्यात आले.
यावेळी हनुमंत मोरे,संदिप ओव्हाळ,मनोज कळमकर,विकी भालेराव,आकांक्षा देशमुख,मधु तिवारी उपस्थित होते.
शिक्षकांची कोरोना चाचणी होत असेल विद्यार्थ्यांची देखील होणे गरजेच आहे.कोरोनाचा कहर सुरू असताना वेळेवर रूग्णवाहिका आणि बेङ मिळत नव्हते.त्यामुळे विद्यार्थ्याना कोरोना झाल्यास शासनाने उपचाराची पूर्ण हमी घ्यावी.
आकांक्षा देशमुख
- हातनोली चौक








Be First to Comment