Press "Enter" to skip to content

सकल मराठा समाज आयोजित किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय एकात्मता टिकवीण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले : डॉ.अतुल साळुंखे 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔶🔷🔷🔶

शत्रूच्या कोटात शिरुन त्यांच्यावर विजय मिळविण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. सामर्थ्य मिळविण्यासाठी व्यक्तीने आपल्यातील कमीपणा शोधला पाहिजे. आपल्यातील कमीपणा शोधून प्रत्येक किल्ला जिंकण्याचे धाडस पुर्ण केले.महाराजांचा इतिहास अजरामर करायचा असेल आणि महाराजांचा अभ्यास पहायचं असेल तर किल्ल्यांमुळे पाहता येईल. देशाला गरज असलेल्या कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.भविष्य काळात जर कोणत्या प्रसंगाला तोंड द्यायचे असेल तर कौशल्य टिकविणे गरजेचे आहे.किल्ला बांधत असताना चार भाग महत्वाचे असतात. त्या किल्ल्याची रचना महत्वाची असते आणि म्हणूनच सर्व समाजातील सेनापती यांना त्यांच्या कामगिरीबद्दल योग्य तो न्याय देत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले असे विधान डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे यांनी नुकतेच रोहा तालुका सकल मराठा समाज आयोजित किल्ले स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले. 

रोह्यातील ज्येष्ठ नागरीक सभागृहात बक्षीस समारंभ कार्यक्रमात यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते प्राचार्य डॉ.अतुल साळुंखे यावेळी बोलत होते.याप्रसंगी समाजाचे जेष्ठनेते विजयराव मोरे,तालुका अध्यक्ष प्रदीप (अप्पा) देशमुख,उपाध्यक्ष नितीन परब, राजेंद्र जाधव, निलेश शिर्के, प्रशांत देशमुख, मराठा समाज माणगाव ता.अध्यक्ष शंकर पवार,उपाध्यक्ष नरेंद्र जाधव,युवा अध्यक्ष संजोग मानकर, सुहास येरुणकर उपस्थीत होते. 

   या स्पर्धेसाठी तालुक्यातून किल्ले बांधणी स्पर्धेत ३६२ स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धकांनी ६० किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. हुबेहूब आणि अप्रतिम प्रतिकृती साकारल्या मुळे पर्यवेक्ष मंडळी पुढे सुद्धा पारितोषिक जाहीर करताना बाका प्रसंग होता.दरम्यान निवडण्यात आलेल्या पारितोषीकांमध्ये प्रथम क्रमांक देवांशु आरेकर भुवनेश्वर किल्ला विजयदुर्ग, द्वितीय क्रमांक जय गिरोब अंधार आळी-रोहा किल्ला सरसगड, तृतीय क्रमांक राजमुद्रा ग्रुप अष्टमी किल्ला रायगड,  प्रथम उत्तेजनार्थ वेताळ ग्रुप भुवनेश्वर किल्ला धारूर, द्वितीय उत्तेजनार्थ शिव प्रतिष्ठान अष्टमी किल्ला तोरणा, तृतीय उत्तेजनार्थ गीता होम सोसायटी भुवनेश्वर किल्ला तोरणा, चतुर्थ उत्तेजनार्थ  शिव सह्याद्री ग्रुप अष्टमी किल्ला पन्हाळा किल्ल्याला मानांकन देण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  किल्ले स्पर्धेचे परीक्षण इतिहास प्रेमी समीर दळवी,सचिन दळवी,अरुण साळुंखे, आशिष शिंदे,स्वप्निल पवार,समीर खोपडे यांनी केले.सकल मराठा समाजाने गेल्या तीन वर्षात रोहा तालुक्यात किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजनात मुलांना व्यासपीठ तयार केले.या स्पर्धेत सहभाग प्रमाणपत्राबरोबर रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणी प्रमाणपत्र देऊन गौरवील्याने स्पर्धकांत उत्साह निर्माण झाला होता.

     मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी नवनवीन प्रयोग होत असल्याने यावर्षीही नवीन उपक्रमाची घोषणा समाजाचे अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख यांनी केली.यावर्षी किल्ल्याची माती वापरुन एक नवीन झाड लावणे व त्या झाडाची निघा राखून जो किल्ला बांधला होता त्या किल्ल्याचे नाव त्या झाडाला देऊन ते वाढविल्यास पुढल्या वर्षी असे राबविलेल्या उपक्रमाबाबत परीक्षकाना माहीती दिल्यास ज्या स्पर्धकांनी झाड चांगल जगवल असेल त्यास रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल असे सकल मराठा समाजाकडून घोषित करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.