Press "Enter" to skip to content

भाजपा ने केली वाढिव विजबिलांची होळी


वाढीव वीजबिल होळी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल(प्रतिनिधी)

दिला शब्द कसा फिरवावा हे शिकायचे असेल तर माहविकास आघाडी सरकारचे कार्यप्रणाली मधून शिकावे.वाढीव वीजबिले माफ करू अशी दर्पोक्ती करणाऱ्या राज्य सरकारने अखेर शेपूट घालत बिले भराविच लागतील अशी भूमिका घेतली.त्यामुळे या विश्वासघातकी,स्थगिती बहाद्दर सरकारच्या विरोधात भाजपच्यावतीने आज (दि. २३) पनवेलमध्ये वीजबिल होळी आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी ‘वाढीव वीज बिल रद्द करा’ अशी जोरदार मागणी करतानाच ठाकरे सरकारच्या अनागोंदी कारभाविरोधात घोषणाबाजी झाली.ठाकरे सरकार हाय हाय च्या घोषणांनी पनवेल दुमदुमले

वीज बिले कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार शब्दावरून फिरले आहे,
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन झाले. या आंदोलनाला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ नेते सुनिल घरत, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, तेजस कांडपिळे, एकनाथ गायकवाड, संजय भोपी, किसान मोर्चाचे अशोक गायकर, अनेश ढवळे, शशिकांत शेळके, सी. सी. भगत,पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका सिद्धीका पुंजानी, नीता माळी, संजय भगत, भीमराव पोवार, अमरीश मोकल, शिवाजी भगत, मनोहर मुंबईकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, ज्योती देशमाने, मनिषा चिले, सपना पाटील, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवडणुकीत मतदारांना अनेक आश्वासने देणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकासाआघाडीने आश्वासनांची कोणतीही पूर्तता न करता उलट जनतेला धारेवर धरण्याचे काम केले आहे. या महाविकास आघाडीच्या मनमानी कारभाराला राज्यातील जनता पुरती कंटाळली आहे. कोरोनामुळे नोकरी, धंदा, व्यवसायावर परिणाम झाले असताना मात्र राज्य सरकारने वीज वाढीव देयके देऊन ग्राहकांना वेठीस धरले आहे.
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने यू-टर्न घेतला आहे.
‘कोरोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असे म्हंटले आहे. ‘त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपाने राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन पुकारले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरकारने जनतेचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते मात्र ‘ठाकरे सरकारमध्ये सत्तेसाठी सारे काहीही’ असे चालले असल्याने जनतेत राज्य सरकारबद्दल दिवसेंदिवस रोष वाढला आहे. तर दुसरीकडे जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम भाजप करीत असल्याचे अधोरेखित होत आहे.

जनतेच्या भल्याचे निर्णय या तिघडी सरकारला घेता येत नाहीत.जनता त्रस्त असताना हे सरकार त्यांची दालने हायफाय करण्यात पैसे घालवत होते,उंची गाड्या घेण्यासाठी पैसे व्यर्थ घालवत होते.मोक्याच्या जमिनी घशात घालण्याचा घाट घालत होते,सगळ्यात कहर म्हणजे उगाच नको तो विषय पेटवून कंगना चे घर पाडत बसले…वाढीव वीजबिल, कर्जमाफी,आपत्ती निवारण आणि पुनर्वसन निधी हे सगळे प्रश्न प्रलंबित असून हे सरकार फक्त स्वतःसाठी ओरबडण्याचे काम करत आहे,कारण हे फार दिवस टिकणार नाहीत हे त्यांना सुद्धा माहित आहे.

बाळासाहेब पाटील,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.