सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔶🔷🔷
शेकापचे जेष्ठ नेते अनंतराव देशमुख यांचे जेष्ठ बंधू सखाराम देशमुख यांचे चौक येथील हातनोली राहत्या घरी दुःखद निधन झाले. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.
शिक्षकी पेशात असताना देशमुख गुरुजी यांचा सन 1965 मध्ये रायगड जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. त्यांनी पुरस्काराला साजेस चाळीस वर्षे आदर्शवत सेवा केली. गुरुजींच्या पश्चत त्यांचे मोठे कुटुंब आहे. देशमुख गुरुजींची निधनाची बातमी समजताच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची त्यांच्या निवस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासोबत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, खालापूर तालुका शेकाप चिटणीस संदीप पाटील, शेकाप पुरोगामी उपाध्यक्ष विशाल देशमुख, रायगड जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे उपयुक्त अधिकारी, कळमकर वाघमोडे आदी उपस्थित होते.








Be First to Comment