Press "Enter" to skip to content

रंगवली स्पर्धेत प्रणाली पाटील तर किल्ले स्पर्धेत नैमिषा दळवी प्रथम

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔶🔶

कर्जत तालुक्यातील वदप गावातील जय हनुमान सेवा मंडळ हे तरुण मुलांचे सामाजिक व सेवाभावी मंडळ आहे. मंडळा तर्फे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी दीपावलीनिमित्त वदप गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लहान मुलांना लक्षात रहावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी किल्ले तयार करणे व रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते.

यामध्ये रंगवली स्पर्धेत प्रणाली पाटील तर किल्ले स्पर्धेत नैमिषा दळवी प्रथम क्रमांक पटकावला.

आपल्या तालुक्यातील गरीब आदिवासी मुलांना दिवाळी फराळ मिळावा यासाठी मंडळाच्या वतीने तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोभेवाडी कर्जत विद्यार्थ्यांना रोजी फराळ वाटप करण्यात आला . जय हनुमान सेवा मंडळ यांच्यावतीने घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत रांगोळी प्रथम क्रमांक प्रणाली पाटील, द्वितीय क्रमांक ममता भोईर, तृतीय क्रमांक किरण क्षीरसागर व किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक नैमिषा दळवी, द्वितीय क्रमांक अर्चना पाटील व तृतीय क्रमांक तनिक्षा पाटील यांनी क्रमांक पटकावला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विजेत्यांसाठी स्मृतीचिन्ह व रोख रक्कमांची पारितोषिके देण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे शाहीर श्री गणेश ताम्हाणे, समीर येरूणकर, सुरेश पाटील, कैलास पोटे, खंडू शिंदे, मनोहर भोपतराव, भगवान चव्हाण, मारुती भोईर, नीलिकेश दळवी, कृष्ण चव्हाण, सुभाष पाटील व जय हनुमान सेवा मंडळातील अजित पाटील, विकास चव्हाण, प्रकाश चव्हाण, राहुल भोईर, सचिन चव्हाण, रोहिदास येरूनकर, श्याम शिंदे, अतुल पवार, नितीन येरूणकर, संदीप चव्हाण, नयनीश दळवी, सचिन मंडलिक, वैभव भोपी, वैभव मुळे, गणेश पारठे, विजय चव्हाण, दिलीप वेखंडे अमित शिंदे हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.