सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी । 🔷🔷🔷
दिवाळी निमित्ताने महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं,एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्या-कोपर्यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व आहे.छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. अशीच भावना लहान मुलांनीही जोपासली असून दिवाळीच्या दिवसात लहान मुले गडकिल्ले बनविण्यासाठी सज्ज असतात.
अलिबाग रामनाथ येथील श्री शिवशक्ती सो. येथील विराज सावंत, हर्षित सोनार,तेजस वाघमारे तसेच लहान बालगोपालांनी तयार केलेली गडकिल्ल्यांची पूर्णाकृती.








Be First to Comment