कोव्हीड योद्ध्याना केले फराळ वाटप 🔶🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । श्रीनिवास काजरेकर । पनवेल । 🔷🔷🔷
भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने पनवेल परिसरातील कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. पनवेल शहरातील तिन्ही पोलीस ठाणी, उप-जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक यांना दिवाळी फराळ देऊन यथायोग्य सन्मान करण्यात आला.

याबरोबरच कोरोना विरुद्धच्या युद्धात आपल्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या ह्या योध्यांची प्रशंसा करणारी एक स्वरचित कविता संस्थेचे पनवेल अध्यक्ष श्री गिरीश समुद्र यांनी सर्वांना भेट म्हणून दिली.

आपल्या कार्याची यथोचित दाखल घेतली गेली यासाठी सर्व योद्धयांनी समाधान व्यक्त केले. व दीपावलीचा आनंद दिल्याबद्दल या सर्व कोव्हिड योद्ध्यानी भारत विकास परिषदेचे आभार मानले.
"हे खरे आधुनिक योद्धे"
कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी या सर्वांनी जीवावर उदार होऊन आपली मौलिक सेवा आणि कर्तव्य बजावले आहे. हे खरे आधुनिक योद्धे आहेत. यांना दिवाळी सणाचा आनंद देण्याचा अल्पसा प्रयत्न भारत विकास परिषदेने केला आहे.
गिरीश समुद्र
अध्यक्ष, भारत विकास परिषद
पनवेल








Be First to Comment