सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔶
नागोठणे जवळील पाटणसई (वाकण ) गावातील जेष्ठ नागरिक आगरी समाज बांधव निवृत्त सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी कृष्णा व्हाळ्या जोशी (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कै. कृष्णा जोशी यांच्या निधनाने त्यांचे आप्तेष्ट, मित्रपरिवार, समाज बांधव व ग्रामस्थ यांच्यात शोककळा पसरली आहे.
कै. कृष्णा जोशी हे संयमी स्वाभावाचे होते. त्यांनी काबाड कष्ट करुन आपल्या मुलांना शिक्षण देऊन मोठे केले. ते सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यावेळी मशनरी नव्हत्या म्हणून रस्त्यावर डांबरीकरण करताना ते आपल्या हाताच्या सह्याने डब्यामधील गरम डांबर घेऊन डांबर मारत असत. कै. कृष्णा जोशी हे आपल्या परिचयाचे असलेल्या व्यक्तींच्या सुख-दुखःत नेहमी सहभाग घेत असत.
कै. कृष्णा जोशी यांच्या पश्चात पत्नी यमुना,राजेंद्र,संतोष,प्रकाश,हनुमान,संदेश अशी पाच मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.







Be First to Comment