Press "Enter" to skip to content

शेलघर बनवले प्रकल्पग्रस्तांचे रोल मॉडेल गाव

95 प्रकल्प ग्रस्त गवांसमोर कामगार नेते महेंद्र घरत यांनी निर्माण केला आदर्श 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । उलवे । विशेष प्रतिनिधी । 🔶🔶🔶

दीपावली मधील लक्ष्मी पूजन आणि कामगार नेते महेंद्र घरत यांची पत्रकार परिषद यांचे एक अतूट नाते बनले आहे.प्रत्येक वर्षी दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनांनी केलेल्या विधायक कामांचा लेखाजोखा पत्रकार बांधवांच्या समोर ते संवाद कार्यक्रमातून मांडत असतात. परंतु या वर्षीचा दीपावली संवाद मात्र अतुलनीय आणि “न भूतो न भविष्यती” असा ठरला.महेंद्र घरत यांनी प्रकल्पग्रस्तांना करिता वसवलेल्या आदर्शवत अशा शेलघर गावाचा चेहरामोहरा पत्रकारांना पाहता यावा या उद्देशाने यंदाचा संवाद कार्यक्रम शेलगाव गावी आयोजित केला होता.

याठिकाणी सिडकोच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या नागरी सुविधांचे प्रदर्शन पत्रकारांना पाहता यावे या उद्देशाने या सोहळ्याला एक वलय प्राप्त झाले होते. महेंद्र घरत यांच्यात धोरणी नेतृत्वाने निर्माण केलेल्या रोल मॉडेल शेलघर चे स्वरूप पाहता केवळ इतकेच म्हणावे लागेल की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !

इंटक चे राष्ट्रीय सचिव आणि न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि लंडन स्थित इंटरनॅशनल ट्रेड फेडरेशन चे उपाध्यक्ष महेंद्र घरत हे कामगार क्षेत्रातील दीपस्तंभ बनले आहेत . विविध क्षेत्रातील कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत नेहमीच सज्ज असतात.गेली अनेक वर्षे हे दीपावलीच्या शुभमुहूर्तावर तमाम पत्रकार बांधवांची कामगार संघटनांच्या माध्यमातून केलेल्या विधायक कामांना प्रसिद्धी माध्यमांच्या समोर आणत असतात. परंतु यंदाच्या वर्षी आयोजित पत्रकार परिषद मात्र अनोख्या पद्धतीची पत्रकार परिषद होती असे म्हणावे लागेल.

समाजमंदीराची भव्य इमारत

कामगार क्षेत्र सोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये महेंद्र घरत यांनी केलेल्या भरीव कामगिरीचा ठसा प्रसिद्धीमाध्यमांना पाहता यावा या उद्देशाने या वर्षीच्या पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन या गावी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध संघटनांच्या माध्यमातून झालेल्या वेतनवाढ करार तसेच अन्य सामाजिक उपक्रमांचे बाबतीत पत्रकारांना अवगत करण्यात आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रकल्पग्रस्त म्हणून विस्थापित झालेल्या गावांना सिडकोच्या माध्यमातून देण्यात येत असणाऱ्या सुविधांचा परिपूर्ण वापर करत एक रोल मॉडेल गाव म्हणून शेलघर ज्या पद्धतीने आज कात टाकून एक आदर्श गाव बनले आहे त्याचे दर्शन सर्व पत्रकारांना विस्मयित करून गेले.

संपुर्ण गांव सीसीटीव्ही कॅमेराने सज्ज

सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा समाजाचे मंदिरात हा कार्यक्रम पार पडला, याच भव्य दिव्य अशा वास्तूमध्ये स्टेट ऑफ द आर्ट स्वरूपाच्या अद्ययावत जिम्नॅशियम उपस्थितांचे डोळे दीपावले.विशेष म्हणजे या व्यायामशाळेच्या देखरेखीसाठी गावातीलच काही तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याठिकाणी ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण ग्रंथांचे वाचन ग्रामस्थांना करता येते.विशेष म्हणजे या दोन्ही सुविधा ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. संपूर्ण गाव तब्बल 48 कॅमेऱ्यांनी सीसीटीव्ही युक्‍त असल्याने गावांमधील नागरिकांना सुरक्षिततेची परिपूर्ण हमी देण्यात येत आहे.

गावाचा फेरफटका मारला असता कुठेही गटार अथवा कचराकुंडी दिसत नाही. याचे सारे श्रेय भूमिगत गटार योजना आणि घंटागाडी योजना यांना द्यावे लागेल.

ग्रंथालय

शेलघर गावाच्या भव्यदिव्य आणि पारंपारिक संस्कृती जपणाऱ्या प्रवेश कमानी या गावांमध्ये स्वागत करताना उपस्थितांचे मन प्रसन्न करून गेल्या. गावातील तब्बल साडेतीनशे तरुणांना कायमस्वरूपी रोजगार देण्यामध्ये महेंद्र घरत यांचा सिंहाचा वाटा आहे. या गावाला ग नवा शेवा शिवडी ट्रान्स हार्बर रस्त्याचे प्रस्तावित बांधकाम होणार असल्याने गावाचे भविष्य अत्यंत उज्ज्वल समजले जाते.

अत्याधुनिक जीम

महेंद्र घरत यांनी ह्या प्रकारात संवाद कार्यक्रमात ते करत असलेल्या लोकाभिमुख कार्यक्रमांचे बाबत सविस्तर विश्लेषण करताना माझ्या लेखी जनता प्रथमस्थानी आहे असे महत्त्वपूर्ण विवेचन केले. यावेळी वैयक्तिक संघर्ष पत्रकार बांधवांना समोर मांडताना कामगार नेते महेंद्र घरत भावुक झाले.कामगार नेते महेंद्र घरत यांच्या वरती पत्रकारांचे असणारे प्रचंड प्रेम पाहता या या पत्रकार संवाद कार्यक्रमास पनवेल, उरण,नवी मुंबई सह रायगड जिल्ह्यातील सुमारे अडीचशे पत्रकार उपस्थित होते.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या पत्रकार संवाद सोहळ्याला कामगार नेते महेंद्र घरत यांच्यासमवेत संघटनेचे कार्याध्यक्ष पी के रमण आणि सचिव वैभव पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार नेते महेंद्र घरत यांनी यापूर्वी एक वेळ उरण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली आहे. चौरंगी लढती मध्ये झालेल्या लढतीत मत विभाजनाच्या दुर्दैवी फटक्यामुळे त्यांना विजयापासून वंचित राहावे लागले. अर्थातच सन्माननीय मते मिळवून देखील त्यांनी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.परंतु त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचा सामाजिक, राजकीय आणि कामगार क्षेत्रातील त्यांच्या कामाचा धडाका पाहता उरण विधानसभेचे नेतृत्व करण्याची क्षमता ही केवळ महेंद्र घरत यांच्यातच असून त्यांनी यापुढे आवर्जून ही निवडणूक लढवली पाहिजे आणि या मतदारसंघाचे नेतृत्व केले पाहिजे ही भावना उपस्थित समस्त पत्रकारांनी सिटी बेल समूहाच्या वार्ताहरा कडे प्रकट केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.