सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔷
बँक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेचा मनमानी कारभार सुरू असल्याने त्या परिसरातील बँक खातेदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कर्जत तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र कशेळे शाखेची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 अशी आहे. परंतु बँक कर्मचारी 10:30 वाजता येतात आणि 2 वाजता व्यवहार बंद करतात, दुपारी अर्धा तास जेवणाची सुट्टी असते, या वेळेत खातेदार उपाशी पोटी बँकेच्या बाहेर जेवणाची सुट्टी कधी संपते याची वाट पाहत असतात.
कशेळे परिसरातील पन्नास गावातील नागरिकांची खाती या बँकेत आहेत. लॉकडाऊन मुळे मिनिडोअर, एस टी सुविधा नसल्याने पंधरा वीस कीलोमीटर पायी प्रवास करून गोर गरीब आदिवासी सकाळी 7 वाजल्या पासून बँकेच्या दारात येत असतात. कर्मचारी उशिरा येत असल्याने बँकेत फार गर्दी होते. त्यामुळे कर्मचारी आणि शिपाई ग्राहक खातेदारांना बरोबर फार अरेरावी करतात.
बँकेत पैशाचा नेहमीच तुटवडा असल्याने खातेदारांना दोन तीन फेऱ्या माराव्या लागतात. बँकेत साधे पिण्याचे पाणी सुद्धा नसल्याने त्यांना शेजारील रहिवाशांकडून पिण्याचे पाणी मागावे लागत असते.
बँकेच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याकडे वरिष्ठ लक्ष देतील का ? असा सवाल कशेळे चे सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी उपस्थित केला आहे.








Be First to Comment