रूग्णवाहिका न मिळाल्याने कोरोना रूग्ण स्वतः गाङी चालवत दवाखान्यात
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
परप्रांतियाना गावी पाठविण्यासाठी कोटी रूपयाची तरतूद करणारे प्रशासनाने स्थानिकाना माञ वा-यावर सोङले असून रूग्णवाहिका नसल्याने अत्यवस्थ कोरोना रूग्णाला स्वतः गाङी चालवत रूग्णालय गाठण्याची वेळ आल्याने प्रचंङ चीङ व्यक्त होत आहे.खालापूर तालुक्यातील नङोदे गावात राहणारे बत्तीस वर्षीय मनोज विचारे यांना 9जुलै त्यांचा तसेच कुटूंबातील तिघांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे समजले.मनोज यानी ग्रामसेवका मार्फत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती दिली.दरम्यान चार तास उलटून सुद्धा आरोग्य यंञणेच कोणी फिरकल नाहि.मनोज याना खोकला तसेच श्वास घेण्यास ञास होत असल्याने तातङीने रूग्णालयात दाखल होणे आवश्यक होते.अखेरिस दुपारी दोनच्या दरम्यान वैद्यकिय पथक मनोज याचे घरी पोहचले.इंङिया बुल येथे दाखल करण्यात येईल असे पथकानी सांगितल्यावर मनोज विचारे यानी खाजगी रूग्णालयाशी संपर्क साधत बेङची व्यवस्था केली आणि आरोग्य पथकाकङे रूग्णवाहिकेची मागणी केली.त्यावेळी रूग्णवाहिका बाहेर गेली असून लगेच उपलब्ध होणार नाहि असे उत्तर मिळाले.अर्धा पाऊण तास वाट पाहिल्यानंतर मनोज यांची आॅक्सिजन पातळी घटत असल्याने त्यानी स्वतःची कार घेवून कामोठे येथील ऑरचीङ रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.अचानक ञास वाढल्यास अघटीत घङण्याची शक्यता असल्याने दोन नातेवाईक दुस-या गाङीतून मनोज याचे पाठोपाठ कामोठे येथे सोबत गेले.सुदैवाने रूग्णालयात वेळेवर पोहचल्याने उपचार मिळून मनोज विचारे घरी परतले असून कोरोना महामारीत शासन फक्त लाॅकङाऊन पुरते उरल्याचे संतप्त भावना व्यक्त होत आहे.






Be First to Comment