सिटी बेल लाइव्ह । भिसेगाव – कर्जत । सुभाष सोनावणे । 🔷🔷🔷
गोरगरीब , कष्टकरी , निराधार , आदिवासी – कातकरी समाजासाठी अहोरात्र काम करणारे दिशा केंद्राचे संचालक दिवंगत अशोक जंगले यांचा श्रद्धांजली शोकसभेचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात सर्वानुमते आयोजित केला होता. यावेळी अनेक राजकीय – शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
यावेळी श्रद्धांजलीपर बोलताना माजी आमदार सुरेशभाऊ लाड म्हणाले की ,गोर गरीब , आदिवासी बांधवांचे प्रश्न शासकीय दरबारी अभ्यासू पद्धतीने मांडून काय समस्या आहेत हे अधिकारी वर्गाशी चर्चा करून सोडविण्याची कला व त्या जोगे अभ्यास अशोक जंगले यांच्याकडे होता . माझी व त्यांची जवळची मैत्री होती . त्यांच्याबद्दल मनात आदराची भावना होती . समाजात सामाजिक काम करताना स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष देणे गरजेचे असतांना जीवाचे रान करून काम केले , त्यांचे राहिलेले उर्वरित काम पुढे नेल्यास हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल , विखुरलेल्या कुटुंबाला मार्गी लावण्याचे काम दिशा केंद्राने करावे , अशी विनंती माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ लाड यांनी मत व्यक्त केले .

तर ऍड . कैलास मोरे यांनी त्यांच्या अकाली निधनाने रायगड सह कर्जत तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे , दिवंगत अशोकभाऊ जंगले हे काम करतांना निस्वार्थी भावनेने काम केले . त्यांच्या अकाली जाण्यामुळे त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे ,म्हणून समाजाने देखील त्यांना मदतरुपी योगदान करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले .
हरिश्चंद्र यादव – ( रायगड जिल्हा उपाध्यक्ष वंचित )म्हणाले की , सामाजिक काम करताना त्यांनी माणसे गोळा केली ,मात्र पैसा कमावला नाही , असे मत व्यक्त केले . दीपक बेहरे ( भाजप रायगड जिल्हा सचिव ) म्हणाले की , अशोक भाऊंचे काम खुपच जोखमीचे होते , आदिवासी – कातकरी समाजाला समजावून कृती करण्यास सांगणे कठीण काम होते , त्यामुळे ते अहोरात्र समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध , भांडण तंटा सोडविण्याचे काम करत असत , त्यांच्या कुटुंबाला सावरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .
संतोषशेट भोईर ( शिवसेना संघटक ) म्हणाले की , प्रत्येकवेळी त्यांचे मार्गदर्शन मला घडले आहे , त्यांचे काम बेफाम असे होते ,दुसऱ्याला मदत करणे असेच त्यांचे नेहमी धोरण असे , असे मत व्यक्त केले .तर त्यांचे बालपणी पासूनचे मित्र पिराजी कांबळे ( पत्रकार ) म्हणाले की , त्यांचे काम रायगड सहित गंगाखेड येथे देखील प्रेरणादायी होते , त्यांनी विद्यार्थी दशकापासून समाजासाठी काम केले , त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर आघात झाला आहे , पुढे त्यांच्या कुटुंबाची हेळसांड होऊ नये म्हणून त्यांच्या पत्नी बीएससी बीएड झाल्या आहेत त्यांचे दिशा केंद्राने नोकरीस घेऊन पुनर्वसन करावे , व आधार द्यावा , हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल , असे मत मांडले .

यावेळी डॉ. ढवळे , नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड , रमाकांत जाधव , डॉ. बनसोडे यांनीही आपले विचार मांडले . या श्रद्धांजली शोकसभेस राम म्हस्के , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , नगरसेवक उमेश गायकवाड , भाजप जिल्हा सचिव दीपक बेहरे , आर पी आय जिल्हा संपर्कप्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड , ऍड . कैलास मोरे ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव , अमीर मणियार – राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष , प्राध्यापक सिद्धार्थ परतवाघ , पत्रकार पिराजी कांबळे – गंगाखेड ,प्रसिन्नजित म्हस्के , दामोदर जोंधळे , सूर्यकांत साळवे , बाळासाहेब जंगले , कृष्णा कंधारकर , राहुल डाके ,आदी मान्यवर उपस्थित होते . सदरच्या शोकसभेस त्यांचे मित्रपरिवार , नातेवाईक ,दिशा केंद्राचे कर्मचारी व कर्जतकर मोठया प्रमाणात उपस्थित होते . यावेळी सूत्र संचालन पत्रकार विद्यानंद ओव्हाळ यांनी केले .








Be First to Comment