Press "Enter" to skip to content

मुलभूत सुविधा कागदपत्र मिळण्यासाठी आजही आदिवासीं समाज वंचित

आदिवासी समाजाला मुलभूत सुविधांसाठी कागदपत्र मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज : जयपाल पाटील 🔶🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । 🔷🔷🔷

आजही आदिवासी समाजाकडे आधार कार्ड, रेशनकार्ड सारखी सरकारी कागदपत्र नसल्याने शिक्षण, वीज, पाणी, रस्ता यासारख्या मुलभूत सुविधांपासून गणपतीचीवाडी वंचित आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे रायगड भूषण जयपाल पाटील यांनी म्हटले.

भारत स्वतंत्र्य होऊन आज ७३ वर्ष पूर्ण होऊन आपण ७४ वर्षाकडे वाटचाल करत आहोत. तरीही आज आपल्या जवळ अजूनही अशी लोकवस्ती आहे, जिथे लाईट नाही, वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही. त्या ठिकाणी चक्क आठ आदिवाशी कुटुंब गेली ३० वर्षापासून वास्तव्य करून राहत आहेत. पण आवश्यक मुलभूत सुविधांच्या जीवनआवश्यक गोष्टींपासून पूर्णता वंचित असणारी ही लोकवस्ती आपल्या अलिबाग तालुक्यात आहे. यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

लॉकडाऊन संपले असले तरी कोरोना अजूनही संपलेला नाही त्यामुळे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मास्क, बिस्किट, फळ हे वाटण्यासाठी आदिम दुर्गम वस्तीला प्राधान्य देणारे जेष्टपत्रकार श्री जयपाल पाटील हे गणपती आदिवाशी वाडी- असे नाव असलेल्या मांडवा, अलिबाग या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहचले असता, तिथे राहणाऱ्या या आठ कुटुंबांना हा सुखद धक्का होता, पण त्याहीपेक्षा मोठा धक्का तिथे पोहचलेल्या कार्यकर्त्याना बसला तो त्यांची वेदना ऐकुन, निसर्ग चक्रीवादळात आमची घर उद्ध्वस्त झाली. तरीहि आजपर्यन्त आम्ही या जगाचा भाग नसल्याप्रमाणे कुणीही आमची दखल घेतली नाही हे सांगताना तेथील महिलावर्गाच्या डोळ्यात पाणी तरळले.

आपल्या अनोख्या कार्यातून आदिवासीच्या विकासासाठी झटणारे जयपाल पाटील जेष्ठ पत्रकार, सोई सुविधांपासून वंचित असणाऱ्याना त्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा शोध घेणारे सुरेश नाईक अध्यक्ष आदिम आदिवाशी समाज विकास सेवा संस्था वाघोडे, मुकेश नाईक खजिनदार, कातकरी समाज संघटना अलिबाग, यांच्या या समाजकार्यमुळे वीज, पाणी, रस्ता या सुविधा नव्हे तर ना डोक्यावर धड छप्पर नसलेल्या या कुटुंबा पैकी फक्त एक दोन व्यक्तीन कडेच आधार, रेशनकार्ड या सारखी सरकारी ओळख देणारी कागदपत्रे आहेत. उरलेल्यानकडे  ३० वर्ष एकाच ठिकाणी राहून ही कोणतेही सरकारी कागदपत्र नाहीत हि माहिती मिळाली. तसेच ना रेशनिंग कार्ड, ना आधार कार्ड त्यामुळेच हा स्थानिक आदिवाशी समाज पूर्णपणे विकासागंगेच्या प्रवाहापासून अलिप्त राहीला आहे, एकहि मूल शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये हे सरकारी धोरण असताना हि या आदिवाशी वाडी वर राहणारी मुले त्यांच्याकडे केवळ आधारकार्ड नसल्याने शिक्षणापासून वंचित राहात आहेत हे सांगताना त्याच्या पालकांनचा त्रागा समजण्यासारखा आहे.

आतापर्यंत या वस्तीची नोदणी का झाली नाही याचा शोध घेण महत्वाचे असताना अनेक कारणापैकी एक कारण म्हणजे ही लोकवस्ती हातावर कमावण्यासाठी मोलमजुरी करणारी, रानमेवा गोळाकरणारी असल्याने या लोकांनपर्यंत दिवसा पोचल्यानंतर त्यांची माहिती देणारे कुणीच जागेवर नसल्याने जनगणनेमध्ये हि त्यांची नोंद होणार कशी हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे, त्या लोकवस्तीला मास्क, बिस्किट, फळ यांचे वाटप केले त्यावेळी कार्यकर्ते पुष्पा मुकेश नाईक सदस्य- कातकरी समाज संघटना, रोहिदास विष्णु नाईक-सदस्य, राजेश्री नाईक-सदस्य, विकास म्हात्रे, निमिषा म्हात्रे, विकास रणपिसे- छायाचित्रकार हे उपस्थित होते. या प्रसंगी जयपाल पाटील यांनी कागदपत्र नसलेल्या या कटुंबांची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांन पर्यंत पोहचवून त्यांना सुविधा उपलब्धकरून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची भावना व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.