Press "Enter" to skip to content

हभप निवृत्ती महाराज देशमुख संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔷

चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक पाटील यांच्यावतीने सामाजिक प्रबोधन करणारे ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अकोले इंदुरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने संस्थापक दिपक पाटील यांच्याहस्ते संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी उद्योजक निलेश घरत, फाउंडेशनचे पुणे जिल्हा ध्यक्ष सिध्दार्थ जाधव, अभिजित खेबडे,अनिकेत तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख यांनी किर्तंनातून समाजप्रबोधन करुन माणुसकीचे दर्शन घडविण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे.त्यांच्या कार्यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच असल्याने हभप निवृत्ती महाराज देशमुख यांना कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने संत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे संस्थापक दिपक पाटील यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.