अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वडगांव यांच्याकडून चौथी नोटीस 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । 🔶🔶🔶
ग्रुप ग्रामपंचायत वडगांव हद्दीत असलेला वाशिवली येथिल सर्वे नं.२४/१ते २४/९ अ असलेल्या राखिव गावठाणवर अदिवासी बांधवांनी अतिक्रमण केला असल्यामुळे सन २००९ पासून कागदी घोडे नाचविले जात असून मात्र अजूनही अतिक्रमण हटले नाही.
या ठिकाणी अदिवासी बांधवांनी घरे बांधण्यात आली आहे.पेण, पनवेल त्याच बरोबर अजू बाजुच्या परीसरातील आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केले आहे.हे अतिक्रमण हटवून वाशिवली येथिल ग्रामस्थांना त्यांची राखीव गावठाण मिळावे या दृष्टीकोणातून ग्रामपंचायत च्या माध्यमातून या अतिक्रमण केलेल्या आदिवासी बांधवांना नोटीस देण्यात आली आहे.
सदरचे अतिक्रमण हटविण्यासाठी वाशिवलीतील ग्रामस्थांनी मा.जिल्हाधिकारी रायगड,आलिबाग , कोकण आयुक्त ,मा. उपविभागीय अधिकारी ,कर्जत यांच्या कडे तक्रार केली आहे.सदर तक्रारीचे अनुषंघांने मा. उपविभागीय अधिकारी उप विभाग कर्जत यानी दिनांक २३ /९/२०१७ चे पत्राद्वारे मा.तहसिलदार खालापूर यांनी दिनांक २६/१०/२०१७ पत्राद्वारे मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती खालापूर यांना मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर यांनी पंचायत समिती खालापूर यांनी २७/१०/२०१७ रोजीचे पत्राद्वारे ग्रूप ग्राम पंचायत वडगांव यांना वाशिवली येथिल सर्वे नंबर २४/अ ,२४/९ या गावठाणावरील केलेले बांधकाम हटविण्याबाबद कलविले होते.यासाठी २२/१२/२०१७ व २ /४/२०१८ रोजी नोटीस द्वारा हे केलेले अतिक्रमण काढून सदरची जागा पुर्वरत करण्याचे कळविले होते.त्याच बरोबरच आपण बांधलेल्या बांधकाम अतिक्रमण ठरल्यास स्व खर्चाने काढून जागा पुर्वरत करुन देण्याचे १०० रुपयांच्या स्टॅम पेपर वर लेखी हमी लिहून दिले होते.तरी सुद्धा अतिक्रमण काढले नाही.
सदरचे केलेले गावठाणावरील अतिक्रमण ग्रामपंचायत वडगांव यांच्या माध्यमातून ही चौथी नोटीस देण्यात आली आहे. सदर राखिव गावठाणावरील केलेले अतिक्रमण तीस दिवसांच्या आत काढावे असे ग्रामपंचायत च्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आहे.मात्र येथिल अदिवासी बांधव कोणत्याही नोटीस ची दखल गांभीर्यने घेत नसून गेले दहा वर्षात अनेक वेळा हा राखिव गावठाण खाली करण्याचे आदेश देण्यात आले.मात्र येथिल आदिवासी बांधव मात्र या आलेल्या अदेशाना केराची टोपली दाखवत आहे.
चौकट : ग्रूप ग्राम पंचायत वडगांव हद्दीतील वाशिवली येथिल असलेल्या राखिव गावठाण वरील अदिवासी बांधवांनी अतिक्रमण करु घरे बांधली आहे.आम्ही ग्रामपंचायत च्या माध्यमातून त्यांस नोटीस देवून तीस दिवसाच्या आत जागा मोकली करण्याचे आदेश दिले आहे.
रश्मी शिंदे – ग्रुप ग्रामपंचायत वडगांव ग्रामसेविका
चौकट : गेल्या दहा वर्षात हे अतिक्रमण हटविण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात येत आहे.मात्र येथिल अदिवासी बांधव हे राखिव गावठाण वरील अतिक्रमण काढण्यास तयार होत नाही. यामुळे आम्हाला हाय कोर्टात ही अतिक्रमण केल्याची याचीका दाखल करावी लागेल
विश्वनाथ पाटील, जयप्रकाश पाटील – ग्रामस्थ तसेच सामजिक कार्यकर्ते








Be First to Comment