सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔶🔶🔶
कोरोना महासंकटापासून कळंबोली वसाहती मधील स्ट्रिट लाईट, रस्ते व गार्डनच्या लाईट बंद आहे . त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असून त्यातून अनुचित प्रकार घडत आहेत तेव्हा त्या त्वरीत चालू करण्यात याव्यात नपेक्षा महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करू अशा इशारा रायगड जिल्हा शिवसेना वाहतुक अध्यक्ष महेश गुरव यांनी महावितरण कंपनीला दिला आहे.
कोरोना महामारीत कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून शासनाने अतिमहत्वाचा उपाय म्हणून लाँकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडणे बंद केले होते. पण आता अनलाँक असल्याने काही प्रमाणात कंपनी व व्यवसाय सुरू होत आहेत. तेव्हा परिवारावर वाईट अवस्था येवू नये म्हणून नोकरी व व्यवसाया निमित्त बाहेर पडावेच लागत आहे. करोना महामारीपासून बंद असलेल्या स्ट्रिट लाईट, रस्ते व गार्डन मधील लाईटचा घरात बंद असल्याने काही फरक रडत नव्हता पण आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे तेव्हा स्ट्रीट लाईट व रस्त्यावरील लाईट बंद असल्याने अनुचित प्रकार होण्याची भीती महिला वर्गाना लागली असून चो-याही होवू शकतात तेव्हा काही अनुचित प्रकार होण्यापुर्वी रस्ते, स्ट्रीट लाईट व गार्डन मधील लाईट त्वरीत चालू करण्यात यावेत अशी मागणी रायगड जिल्हा शिवसेना वाहतूक सेनेचे अध्यक्ष महेश गुरव यांनी सिडको प्रशासनाला केली आहे.







Be First to Comment