Press "Enter" to skip to content

राज्यातील कंत्राटदार साजरी करणार “काळी दिवाळी”

हजारो कोटी रुपयांची देयके थकीत…! देयके न दिल्यास राज्यभर काम बंद करून छेडणार तीव्र आंदोलन 🔷🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे ।धम्मशील सावंत । 🔶🔶🔶

राज्यातील कंत्राटदार यांची देयके दिवाळीपूर्वी जर नाही दिली तर 25 नोव्हेंबर पासुन राज्यभर पहिल्यांदा स्थानिक स्तरावर काम बंद आंदोलन, नंतर शासकीय कार्यालयास कुलुप लावुन ठिय्या आंदोलन व उपोषण केले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

तरीही देयके न दिल्यास ज्या विभागांचे मंत्री आहेत त्यांच्या स्थानिक शहरात त्यांच्या घरासमोर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल व त्यांना सुद्धा काम करणे अवघड केले जाणार आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मोठे उग्र स्वरूपात आंदोलन हाती घेतले जाईल ह्याची नोंद घ्यावी असा इशारा संघटनेच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा (पाली सुधागड )यांनी दिला आहे. 

     महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक व संबंधित खात्याचे मंत्री यांच्याकडे आठ महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. याबाबत तब्बल 16 विनंती वजा पत्र महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने दिली होती. तसेच नोव्हेंबर 2019 पासुन राज्यातील कंत्राटदार यांची सर्व विभागाकडील देयके प्रलंबित आहेत. मार्च 2020 मध्ये कोविड नसतांना देखील शासनाने कोविडचे कारण पुढे करुन जाणीवपूर्वक छोट्या मोठ्या कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजुर सहकारी संस्था यांची देयके देण्यासाठी निधीच दिला नाही आणि यामुळे राज्यातील तीन लक्ष कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांची व कुटुंबांची अक्षरक्ष: उपासमार व वाताहत झाली आहे.

हक्काची देयके देण्याचा मार्च महिन्याचा काळ गेल्यानंतर शासनाकडे संघटनाचा याबाबत पाठपुरावा सुरूच होता. त्यांनतर शासनाने आठ महिन्यांनतर कंत्राटदार त्यांच्या देयकेपोटी फक्त 5 ते 8 टक्के रक्कम दिली आणि कंत्राटदारांच्या तोंडाला अक्षरक्ष पाने पुसून एक प्रकारची चेष्टाच केली आहे. त्यामुळे कंत्राटदार संतापले असून त्यांनी ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. आणि शासनाचा निषेध करत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

      राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे जवळपास सर्व लेखाशिर्ष ची अंदाजे ३.५ हजार कोटी , ग्रामविकास विभाग ७५० कोटी नुसत्या २५१५ लेखाशिर्ष चे ४०० कोटी , नगरविकास विभाग चे २७०० कोटी , जलसंपदा विभाग ६७ ९ कोटी एवढ्या भंयकर प्रमाणात देयके प्रलंबित असताना बाकी सर्व इतर गोष्टी च्या पैशाची ( पगार , भत्ते , दौरे , इतर शासकीय दैनंदिन ) कामे मात्र व्यवस्थित पार पाडली जात आहे हा मोठा विरोधाभास आहे. या छोट्या मोठ्या कंत्राटदार यांची एवढी मोठ्या प्रमाणात देयके प्रलंबित् असताना त्यांची उपासमार होत असतांना दुसरीकडे मात्र राज्यातील ठराविक मोठ्या कंपनीच्या HAM , FD , BOT , या अंतर्गत सुरू असलेल्या कामांना मात्र प्रंचड पैसा शासन देत आहे. यापाठीमागे वरीष्ठ स्तरावरील एकरकमी फक्त आर्थिक वसुली हेच कारण स्पष्ट दिसत आहे. मुद्दामहुन कंत्राटदार यांची देयके द्यावयाची नाही यामुळे मात्र छोटे मोठे कंत्राटदार बँकेची , व इतर आर्थिक वित्तीय संस्था ची देणी देऊन अक्षरक्ष हैरान व देशोधडीला लागला पाहिजे ह्याची जाणीव या शासनकर्त्यांनादिसत नाही का ?

यापाठीमागे ही एधढ्या मोठ्या प्रमाणात असलेला कंत्राटदार यांचा वर्ग बेरोजगार करून मोठ्या कंपनीना पायघड्या घालून मैदान तयार करण्यात आले आहे हा यापाठीमागे हा कुटिलल डाव शासनकर्ताचा आहे. असा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे. सदर शासनान लक्षात ठेवावे की शेती ‘ नंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय हा  कंत्राटदार व्यवसाय आहे. जसे इतर उद्योगांना आपण जसे आर्थिक मदत , पॅकेजची घोषणा करत असता तसेच व त्याच धर्तीवर आता या राज्याच्या  विकासकांना (कंत्राटदार ) सुद्धा मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. कारण तेही उद्योजक असुन प्रंचड मोठ्या प्रमाणात मजुरांना व इतर अनेक घटकांना रोजगार उपलब्ध करून देत असतात. असे पत्रात म्हंटले आहे. हेच पत्र मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , सार्वजनिक बांधकाम मंत्री , ग्रामविकास मंत्री , जलसंपदा मंत्री , नगरविकास मंत्री , राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे.

      सदर आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार आणि राज्य अभियंता संघटनेच्या वतीने राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले , कार्याध्यक्ष संजय मैंद , महासचिव सुनील नागराळे , मार्गदशक , निवास लाड , पश्चिम विभागीय अध्यक्ष सुरेश कुडु पाटील , मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल पाटील , विदर्भीय विभागीय अध्यक्ष सुबोध सरोदे , कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा , उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रकाश पांडव , मुंबई ठाणे विभागीय अध्यक्ष, मंगेश आवळे प्रसिध्द प्रमुख कौशिक देशमुख यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.